पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रेषेमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करा. जेवढे शक्य होईल तेवढे डोके मागे ढकला. मान व छातीवर पडणारा ताण स्वीकारा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. थोडं थांबा. दिलेला ताण मोकळा करा. हात तसेच ठेवा. काया-वाचा- - जीवे - भावे सूर्यनारायणाला नमस्कार पूर्वक प्रार्थना करा. समर्पणाचा श्लोक - - आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वंति दिने दिने जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते ।। नमोधर्मविधानाय नमस्ते कृतसाक्षिणे नमः प्रत्यक्षदेवाय भास्कराय नमोनमः ।। अनेन सूर्यनमस्काराख्येन कर्मणा भगवान् श्रीसविता सूर्यनारायणः प्रियतां न मम ।। ||हरिः ॐ तत्सद ब्रह्मार्पणमस्तु ।। श्लोकाचा अर्थ याप्रकारे साष्टांगनमस्काराचे नित्यकर्म पूर्ण झालेले आहे. सूर्यनारायणानेच मला साष्टांगनमस्कार घालण्यासाठी शारीरिक सामर्थ्य दिले, सूर्यनमस्कार घालण्याची प्रेरणा दिली आणि हे नित्यकर्म माझेकडून करवून घेतले. साष्टांगनमस्काराने केलेली पूजा त्याला परम प्रिय आहे. विनम्र श्रद्धेने हे नित्यकर्म सूर्यनारायणाला अर्पण करतो. अन्वयार्थ - माझे असे काही नाहीच. विश्वाची उत्पत्ती करणारा, धारण करणारा, भरण-पोषण करणारा तोच या सर्वाचा मालक आहे. धनी आहे. मी, माझे, मला हे अज्ञान आहे. म्हणून हे कर्म त्याचे त्याला अर्पण करतो. हे विश्व त्याचे आहे. विश्वार्पण करतो. सर्व सुखी व्हावे म्हणून सूर्यनारायणाचे अर्चन करतो. सूर्यनमस्कार समर्पण श्लोकामध्ये 'यथाशक्ती' हा शब्द येत नाही. (काही पुस्तकात अपवादाने सापडतो.) इतर सर्व संकल्प समर्पण श्लोकांमध्ये तो असतोच असतो. उदाहरणार्थ - अनेन यथाशक्ती गायत्री जपाख्येन कर्मणा भगवान... - सूर्यनमस्कार एक साधना १४८