पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मन एकाग्र करा. हनुवटी छातीला लावा. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष द्या. तोल सांभाळा. कंबरेला ऊर्ध्वताण देण्याचा प्रयत्न करा. सूर्यमंत्र- ॐ आदित्याय नमः अश्वसंचालनासन - सूर्यमंत्र ॐ भानवे नमः अश्वसंचालनासन प्रमाणे - आसनाचा उद्देश उजवा पाय पाठीमागे घेऊन त्याला ताण देणे. आरोग्य लाभ - अर्धभुजंगासन (आज्ञाचक्र) प्रमाणे. अश्वसंचालनासन कृती श्वास घ्या. डावा पाय उचलून डाव्या हाताजवळ ठेवा. बाकी इतर क्रिया अश्वसंचालनासन (ॐ भानवे नमः) प्रमाणे. क्रिया पूर्ण झाल्यावर विश्रांती आसनामध्ये या. - सूर्यमंत्र- ॐ सवित्रे नमः पादहस्तासनाचा उद्देश. - - आडव्या शरीर स्थितीतून उभ्या शरीर स्थितीमध्ये येणे. स्वाधिष्ठानचक्राला ऊर्ध्वदिशेला ताण देणे. आरोग्य लाभ हस्तपादासन (ॐ सूर्याय नमः) प्रमाणे. - अश्वसंचालनासन पादहस्तासन कृती श्वास घ्या. उजवा पाय उचलून तो डाव्या पायाजवळ ठेवा. दोन्ही पायावर बसा. हात जमिनीवर पक्के ठेवा. श्वास घ्या व पार्श्वभाग वर उचला. सूर्यनमस्कार एक साधना पादहस्तासन १४६