पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पर्वताचा पाया स्थिर करण्याचा प्रयत्न करतो आहोत हे लक्षात असू द्या. तृतीय कौशल्य हे आसन करतांना शरीराचे वजन ( गुरुत्वमध्य ) विशुद्धचक्रापासून जमिनीवर हातांच्या दोन पंजामध्ये लंबरेषेत ठेवा. दोन्ही पायांच्या तळव्यांनी जमीन दाबून धरा. पर्वतासन हे या आसनाचे तिसरे कौशल्य पर्वताचा पाया पक्का झाला, चार पायावर स्थिर उभे राहता आले म्हणजे तोंडावर पडण्याची धास्ती अजिबात नाही. आता पर्वताच्या दोन्ही बाजू वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास सोडा, पार्श्वभाग मोकळा ठेवा, पायाने जमिनीला रेटा द्या. विशुध्द चक्राकडे लक्ष देऊन कंबर वर उचला. श्वास सोडा, पार्श्वभाग मोकळा ठेवा, विशुध्द चक्राकडे लक्ष द्या. हाताच्या पंजाने जमिनीला रेटा द्या, खांदे वर उचला. पायांच्या अंगठ्याकडे बघण्याचा प्रयत्न करा. हनुवटी छातीला लावा. ±भुजंगासन झाल्यावर लगेच पर्वतासन येते. शरीराची उलटसुलट कमान करायची. एका प्रकारात चुकीचा ताण - दाब दिला गेला असल्यास चूक दुरुस्त करण्याची संधी लगेच मिळते. स्नायूक्षोभ या आसनामध्ये स्नायू दुखण्याची शक्यता फारच कमी आहे. यामध्ये कमरेला दिलेला ताण सुखकर आहे. दोन हातांमधील अंतर तसेच खांदे व हाताचे पंजे यांची स्थिती यामध्ये चूक झाल्यास कमरेला ऊर्ध्व ताण देतांना तोल जातो. तोंडावर पडण्याची शक्यता असते. हातांना इजा होण्याची शक्यता असते. कमरेचे स्नायू फारच ताठर असल्यास सुरुवातीला भूधरासन/शिरासन करा. शक्य होईल तेवढाच ऊर्ध्व ताण द्या. सावधान - हे आसन करतांना दोन्ही पाय दोन तीन इंच पुढे घ्या. विशुद्ध चक्राकडे 2 पर्वतासन आणि पादहस्तासन लागोपाठ करून पहा. दोन्ही आसने एकमेकांना पूरक आहेत. तसेच त्यांच्यातील वेगळेपण हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे हे लक्षात येईल. या दोन्ही आसनातील काढीण्य पातळी व ऊर्जाचक्राचे अधिष्ठान लक्षात घेऊन या आसनाचा सराव करा. सूर्यनमस्कार एक साधना १४५