पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टाच जमिनीला टेकविण्यासाठी पाय दोन- तीन इंच पुढे सरकवा. संपूर्ण तळवा व पंजा यांचा वापर करून शरीरस्थिती पर्वतासारखी पक्की करा. शरीराचे शिखर आहे स्वाधिष्ठान चक्र ते मध्यभागी पकडा. पर्वतासन दोन्ही हातांनी व पायांनी जमीन पक्की पकडा. गुडघ्याला गुडघा, घोट्याला घोटा लावा. श्वास सोडत किंवा संपूर्ण श्वास सोडल्यानंतर खालील कृती करा. श्वास सोडून हात-पायांनी जमीन खाली दाबा आणि स्वाधिष्ठान चक्र वरती उचला. श्वास सोडून हात-पायांनी जमीन खाली दाबा आणि खांदे वरती उचला. श्वास सोडून हात-पायांनी जमीन खाली दाबा आणि डोके दोन हातांच्यामध्ये आणा. हनुवटी छातीला टेकवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. स्वाधिष्ठान चक्राला दिलेला ऊर्ध्वताण स्वीकारा. थोडं थांबा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. कोणते स्नायू मोकळे होत आहेत याकडे लक्ष द्या. पर्वतासनातील कौशल्य - प्रथम कौशल्य - या आसनातील प्रथम कौशल्य आहे भूधरासन, भुजंगासनातून बाहेर पडल्यावर दोन्ही पाय दोन-तीन इंच पुढे घ्या. दोन्ही हाताचे तळवे व दोन्ही पावले जमिनीवर पूर्णपणे टेकवून लवणे राहण्याचा प्रयत्न करा. शरीरातील सर्व स्नायूंचा ताण - दाब काढून टाकण्याचा प्रयत्न करा. हळूहळू हाताचे पंजे व खांदा साधारण सरळ रेषेत (६०-६५ अंशापर्यंत) येतील याचा प्रयत्न करा. शरीराला मागे न ढकलता सरळ स्थितीत ठेऊन चार पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करा. - द्वितीय कौशल्य - शिरासन हे या आसनाचे दुसरे कौशल्य. याला दुसरे नाव आहे अधोमुख श्वानासन. यामध्ये डोके दोन्ही दंडामध्ये पाठीच्या रेषेत ठेवायचे आहे. दृष्टी पायांच्या अंगठ्याकडे लावायची आहे. पार्श्वभाग मोकळा ठेवायचा आहे. श्वास सोडण्याकडे लक्ष द्यायचे आहे. या स्थितीमध्ये चार पायावर स्थिर उभे राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या व दुसऱ्या कौशल्यामध्ये आपण सूर्यनमस्कार एक साधना १४४