पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सावधान - जमिनीवर तळपायाचे चवडे टेकवणे, गुडघे टेकवणे, हाताचा आधार घेऊन खांदे वर उचलणे, दीर्घ दमदार श्वास घेणे, पार्श्वभाग मोकळा ठेवणे व जोर-झटका न देता शरीर वाकविणे या सर्व कृती अत्यंत सावध राहून करा. या आसनामुळे स्नायूक्षोभ झाला असल्यास दीर्घश्वसनाचा पूर्ण सराव अधिक वेळ करा. भस्त्रिका प्रकार दोन अ) व तीन अ) प्रकार. समजून उमजून पर्वतासन योग्य पद्धतीने करा. मार्जरासन योग्य पद्धतीने करा. गुरूवंदन (बैठासाष्टांग प्रणाम) योग्य पद्धतीने करा. फारच वेदना होत असल्यास सूर्यनमस्कार त्या दिवशी केला नाही तर चालेल. मणक्यांचा विकार असल्यास या आसनाची फक्त मुद्रा स्थिती घ्या व पुढील आसन स्थिती घेण्यास सुरुवात करा. पाठीच्या कण्याचे विकार, पोटाचे विकार (अल्सर, हार्निया इत्यादी ) असणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच या आसनाचा सराव करा. या आसनामध्ये सहजता येण्यासाठी प्रदीर्घ सरावाची गरज आहे. सूर्यमंत्र- ॐ मरीचये नमः पर्वतासनाचा उद्देश शरीराला पर्वताचा आकार देणे. शरीर पर्वताच्या दोन्ही बाजूंना (हात- कंबर व पाय-कंबर) ऊर्ध्व दिशेला ताण देणे. स्वाधिष्ठान चक्राला ऊर्ध्व दिशेला ताण देणे. दोन्ही हात व पाय यांनी जमीन घट्ट पकडणे. विशुद्धचक्राकडे मन एकाग्र करणे. आरोग्य लाभ - ऊर्ध्वहस्तासन (विशुद्धचक्र) प्रमाणे. पर्वतासन कृती - हात व पाय आहे तसेच ठेवा. गुडघे व शरीराचा मधला भाग उंच उचला. सूर्यनमस्कार एक साधना १४३