पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मोकळा ठेवा. मान मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. द्वितीय कौशल्य प्रथम कौशल्य चांगले जमायला लागले की पुढील कृती करण्यास सुरुवात करा. छातीमध्ये दमदार श्वास भरून घ्या. खांदे वर उचला. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देऊन मान व खांदे मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. कमरेला मिळणारा ताण स्वीकारण्याचा प्रयत्न करा. - - तृतीय कौशल्य - हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरुत्वमध्य) स्वाधिष्ठान चक्रापासून जमिनीवर लंबरेषेत ठेवा. गुडघे, चवडे यांचा आधार घ्या. 1 धनुरासन हे या आसनातील तिसरे कौशल्य आहे. अश्वसंचालनासन, साष्टांगनमस्कारासन यातील प्रगती या आसन कौशल्यासाठी पूरक आहे. हस्तपादासन आसनामध्ये आपण शरीराची कमान करतो. या आसनामध्ये शरीराची उलटी कमान करतो. भुजंगासनामध्ये चांगली प्रगती झाली, म्हणजे काहीही त्रास न होता है आसन करता येऊ लागल्यावर पुढील कृती करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास छातीत भरून घ्या. धनुष्याला दोरी बांधण्यासाठी स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देत कमरेची उलटी कमान करण्याचा झेपेल इतपत प्रयत्न करा. गुडघे मांड्या यांना जमिनीचा आधार देऊ नका. (धनुरासन) हा बाक किती द्यायचा ते मेरुदंड किती कडक / लवचिक आहे त्यावर ठरवा. फार संथ गतीने प्रगती अपेक्षित आहे. आदर्श स्थिती मिळविण्यासाठी अधीर होऊ नका. स्नायूक्षोभ - कमरेच्या स्नायुंवर अनावश्यक व चुकीचा दाब दिल्यास कंबर, पाठ, मान दुखणार. चांगलाच त्रास होणार. दीर्घश्वास न घेता कंबरेला दाब दिल्यास कंबर पाठ ठणकणार. 1 भुजंगासन करतांना नाग फणा काढून डोलतो आहे हे चित्र डोळ्यासमोर आणा. धनुरासन करतांना शरीरुपी धनुष्याला दोरी बांधण्याची क्रिया, मेरूदंडाची लवचिकता लक्षात घेऊन करायची आहे हे लक्षात घ्या. सूर्यनमस्कार एक साधना १४२