पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरावसत्र दिवस तिसरा साधकांसाठी (विद्यार्थ्यांसाठी) सूर्यनमस्कार सूर्यमंत्र ॐ हिरण्यगर्भाय नमः - भुजंगासनाचा उद्देश सूर्यनमस्कारातील या आसन स्थितीमध्ये प्राणतत्त्वाचा सर्वात जास्त स्वीकार शरीरामध्ये सहज केला जातो. स्वाधिष्ठान चक्राकडे मन केंद्रित करणे. जास्तीत जास्त प्राणतत्त्व श्वासातून स्वीकारणे शक्य होईल तितके शरीर कमरेतून मागे ढकलणे. साष्टांगनमस्कारासनामध्ये शरीराची (मणिपूर चक्राची) कमान असते. भुजंगासनामध्ये शरीराची (स्वाधिष्ठान चक्राची) उलटी कमान करणे. आरोग्य लाभ - हस्तपादासन (स्वाधिष्ठानचक्र) प्रमाणे. भुजंगासन कृती गुडघे व चवडे आहे त्याच ठिकाणी ठेवा. हाताची जागा तीच ठेवा. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष द्या. गुडघ्याचा आधार घ्या. दीर्घ श्वास घ्या. घोट्यांचा आधार घेऊन शरीर पुढे ओढा. खांदे वर उचला. दीर्घ श्वास घ्या. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देऊन खांदे मागे ढकला. दीर्घ श्वास घ्या. शक्य होईल - भुजंगासन तेवढे डोके पाठीमागे ढकला. दृष्टी आकाशाकडे ठेवा. स्वाधिष्ठान चक्राला मिळालेला ताण स्वीकारा. पार्श्वभाग मोकळा करा. थोडं थांबा. ताण दिलेले स्नायू मोकळे करा. कोणते स्नायू मोकळे होत आहेत याकडे लक्ष द्या. भुजंगासनातील कौशल्य - या आसनातील मुद्रा स्थिती हे प्रथम कौशल्य आहे. सर्वात प्रथम कौशल्य प्रथम शरीरातील सर्व स्नायुंचा ताण-दाब कमी करण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक ताण कोणत्या स्नायुंना होता याची नोंद घ्या. दमदार श्वास घ्या. पार्श्वभाग सूर्यनमस्कार एक साधना १४१