पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळाला. ( वेदना नाही. चमक नाही.) २२ फेब्रुवारी २०११, पुणे. एक ई-मेल - मी एक वर्षापासून सूर्यनमस्कार नियमितपणे घालतो आहे. माझा रक्तदाब व Triglycerides Levels यामुळे आटोक्यात आणण्यास मदत झाली. २६ मार्च २०११ - एक ई-मेल - माझे वय ३९ वर्षे आहे. फेब्रुवारी २००८ मध्ये नायजेरिया येथे कामावर रुजू होण्यापूर्वी लिलावती हॉस्पिटल, मुंबई येथे आरोग्य तपासणी केली. तेथे Stress Test ज्यामध्ये नाडी, हृदयाचे ठोके व शारीरिक क्षमता तपासली जाते - करून घेतली. आलेला निर्णय असमाधानकारक होता. त्यानंतर तीन वर्षापूर्वी सूर्यनमस्कार - प्राणायाम प्रशिक्षण वर्ग पूर्ण केला. त्या दिवसापासून दररोज तीन / चार सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात झाली. आज अठरा सूर्यनमस्कार साधारणपणे वीस मिनिटांमध्ये घालतो. २०११ मध्ये कंपनी बदलून जोहान्सबर्ग येथे रुजू होण्यापूर्वी ही तपासणी पुन्हा केली. चालण्या- धावण्याचा ८.८ किलोमिटर हा वेग काहीही त्रास न होता आरामात घेऊ शकलो. श्वसनसंस्था मजबूत. हृदयविकार नाही. हा निष्कर्ष ओघाने आलाच. याचे सर्व श्रेय सूर्यनमस्कार साधनेला. संदेश – प्रयत्न करण्यामध्ये चुका होतील पण प्रयत्न चुकवू नका. ०३ ऑक्टोबर २०११, जोहान्सबर्ग - अशा प्रकारचे उत्साहवर्धक अनुभव प्रत्येक साधकाला नित्यनेमाने येत असतात. माझ्यापर्यंत पोहचलेल्या त्यातील फक्त काही अनुभवांची नोंद वर घेतली आहे. (आलेले ई-मेल इंग्रजी. त्याचे स्वैर भाषांतर. नाव पत्यांचा उल्लेख मुद्दाम केलेला नाही.) तसे पाहिले तर साधकाला मिळालेली दररोजची अनुभूती पुढील दिवसासाठी आश्वासक असते, मार्गदर्शन करणारे असते. इतरांसाठी हे अनुभव सूर्यनमस्कार नित्यकर्म स्वीकारण्याची प्रेरणा देणारे असतात. सूर्यनमस्कार साधनेतील अनुभवांचा दुसरा प्रकार वरील अनुभवांच्या विपरित असतो. स्नायूंमध्ये चमक येणे, स्नायू दुखणे, छातीत दुखणे, शरीरातील उष्णता वाढणे, भूक कमी होणे, मळमळणे, झोपेचे प्रमाण अती वाढणे किंवा कमी होणे असे नानाविध विकार अनुभवास येतात. यामुळे साधनेत खंड पडतो. सूर्यनमस्काराचा उत्साह क्षीण होतो, विस्मृतीत जातो. साधकाला येथेच मार्गदर्शनाची सूर्यनमस्कार एक साधना xvi