पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(अर्धभुजंगासनासाठी हा प्रकार आपण करतो आहोत. संदर्भ घ्या व्यायाम प्रकार एक- वीरभद्रासन ) उंच उडी प्रकार एक + दोन + तीन एक) १२+०१ उंच उड्या मारावयाच्या आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी उड्या किंवा उंच उड्या मारा. इतरांनी उड्या मारल्यासारखे करा. दोन) १२+०१ प्रत्येक उंच उडी मारतांना हात खांद्याच्या रेषेत वर उचला. ०६+०६+०१ या संख्येने दोन्ही प्रकारच्या उड्या मारता येतील. तीन) १२+०१ प्रत्येक उंच उडी मारतांना डोक्यावर टाळी वाजवा. ०४+०४+०४+०१ या संख्येने तिन्ही प्रकारच्या उड्या मारता येतील. सद्गुरू वंदन हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. मेरुदंड सरळ रेषेत ठेवा. गुडघे जोडून ठेवा. श्वास सोडत, गुडघ्यात वाकत, शरीर दोन/तीन इंच खाली घ्या. ही कृती आणखी दोन वेळा करा. गुडघ्याला काही त्रास होत नसल्यास खालील कृती करा. श्वास सोडण्याकडे लक्ष देत हळूहळू गुडघे वाकवा. मेरुदंड सरळ रेषेत ठेवा. खुर्चीवर बसण्याच्या स्थितीपर्यंत या. थांबा. सर्वसाधारण श्वास घ्या. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट मोकळे ठेवा. पाठ सरळ ठेवा. नजर समोर ठेवा. (सूर्याकडे) तीन चार श्वास होईपर्यंत थांबा. दीर्घ श्वास घेऊन सावकाश उभे राहा. सूर्यनमस्कार एक साधना ॥जय जय रघुवीर समर्थ ।। ।। श्रीरामसमर्थ ।। १४०