पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणून आपण प्रयत्न करतो आहे. व्यायाम प्रकार चार अ) सरळ उभे राहा. चवड्यावर उभे राहा. हळूहळू खाली बसा. टाच जमिनीपासून उंच ठेवा. चवड्यावर बसा. हात पायांसमोर ठेवून आधार घ्या शरीराचे सर्व वजन हातांवर घ्या. जोरात श्वास घ्या, छातीमध्ये पकडा, दोन्ही पाय एकाचवेळी मागे फेका. - हातांच्या पंजाने जमिन खाली दाबा. खांदे वर उचलून धरा. श्वास सोडा. घोट्यांचा वापर करून शरीर मागे खेचा. मानेपासून पायापर्यंत दिलेला ताण स्वीकारा. थांबा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास घ्या. उडी मारून दोन्ही पाय दोन्ही हातांमध्ये ठेवा. विश्रांती घ्या. प्रकार - खांदे, घोटे तीन सर्वसाधारण श्वास घेऊन या क्रिया क्रमाने आणखी दोन वेळा करा. या क्रिया पूर्ण झाल्यानंतर पायाचे तळवे टेकून बसा. विश्रांती घ्या. हात पुढे टेकून दीर्घ श्वास घेऊन आरामात उभे राहा. लक्षात ठेवा हा सराव मकरासन चांगले जमावे म्हणून आपण करत आहोत. सूर्यनमस्कार किती ताकदीने घालता येतात याचा अंदाज या आसनामध्ये घेता येतो. सूर्यनमस्कार साधकाने मकरासनाची तिरकी स्थिती पकडल्यावर दुसरा साधक त्याच्या घोट्यावर उभे राहतो. नंतर हळूच एक पाय पोटरीवर ठेवतो, दुसरा पाय दुसऱ्या पोटरीवर ठेवतो. याप्रमाणे मांड्या, नितंब, कंबर, पाठ, खांदे आणि डोक्यावर दोन्ही पाय ठेऊन नंतर खाली उतरतो. (धोक्याची सूचना शरीर सामर्थ्य व साधनेतील कौशल्य प्राप्त झाल्याशिवाय हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नका. ) ब) सरळ उभे रहा. चवड्यावर उभे रहा. हळूहळू खाली बसा. टाच जमिनीपासून उंच ठेवा. चवड्यावर बसा. हात पायांसमोर ठेवून आधार घ्या. शरीराचे सर्व वजन हातांवर घ्या. सूर्यनमस्कार एक साधना १३८