पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सात/नऊ/अकरा / तेरा वेळा करा. ताल धरा. नाचा. व्यायाम प्रकार दोन - भाग तीन - वारकरी हरिपाठ म्हणतांना उजव्या / डाव्या पायावर उडी घेऊन नाचतात - त्याप्रमाणे १२ + ०१ उड्या मारत नाचा. लक्षात ठेवा - या व्यायाम प्रकारातून पायांचे सर्व स्नायू कार्यरत करण्याचे प्रयत्न करायचे आहेत. पाय हे तप करण्याचे साधन आहे. हे सेवाव्रत म्हणजे समाजपुरुष, मातृभूमी यांचा उद्धार करण्यासाठी करावयाचा प्रयत्नयज्ञ आहे. समाज सेवा हीच ईश्वर सेवा व यातूनच मोक्ष प्राप्ती होते हा अध्यात्माचा प्रमुख सिद्धांत आहे. मार्तंडवंशावतंस प्रभुरामचंद्रांनी वनवासात असतांना चौदा वर्षे भारतवर्षात भ्रमण केले. असुरांचा विनाश करण्याचे तप केले. पृथ्वी भयमुक्त केली. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी साधारणपणे याच मार्गाने भारत भ्रमण करून संपूर्ण भारतात बाराशे पेक्षा अधिक मठांची स्थापना केली. सूर्योपासना/शक्ती उपासनेचे अधिष्ठान समाजाला दिले. आपल्या आराध्य दैवताची पाद्यपूजा केली. अध्यात्मामध्ये दासभक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. आपले सद्गुरू, मातापिता, कुलदैवत, आराध्यदैवत, इष्टदेवता, यांनी जसे केले किंवा जे सांगितले त्याप्रमाणे समर्पण बुध्दीने, मनात कोणताही किंतू येऊ न देता ते आचरणात आणणे म्हणजे दास्यभक्ती. आत्मारामाचा दास होणे संकटविमोचनाचा सर्वोत्तम उपाय आहे. कारण आपला आत्मा हा परमतत्त्वाचे / परमेश्वराचे पूर्ण स्वरूपच आहे. म्हणूनच देवळात गेल्यावर प्रथम पादुकांचे दर्शन नंतर देवतेच्या पदकमलावर मस्तक ही आपली संस्कृती आहे. रक्ताभिसरणासाठी पायांवरील नसा हा सर्वात दूरचा टप्पा. अशुद्ध रक्त हृदयापर्यंत घेऊन जाण्यासाठी झडपा आहेत. त्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून पायांनी सतत कार्यरत असावे. यासाठी पायांना अधिक मात्रेमध्ये ऊर्जा मिळावी. ही ऊर्जा मिळण्यासाठी व्यायाम, सूर्यनमस्कार घालावेत. हे सर्व साध्य व्हावे सूर्यनमस्कार एक साधना १३७