पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पायामध्ये अंतर ठेऊन सरळ उभे राहा. खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही हात वर उचला. हातांची बोटे एकमेकांत गुंफा. डोक्याच्या मागील बाजूला गुंफलेल्या पंजाचा आधार द्या. मान मागे ढकला. त्याच वेळेला हाताचा जोर वापरून मान त्याच जागेवर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. ताण स्वीकारा, तीन सर्वसाधारण श्वास घ्या. ताण मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन दोन्ही क्रिया क्रमाने आणखी दोन वेळा करा. व्यायाम प्रकार दोन भाग एक - - सरळ उभे राहा. खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही हात पुढे उचला. दोन हातामध्ये खांद्याचे अंतर ठेवा. पंजे जमिनीकडे वळवा. हात खांद्यातून पुढे सरकवा. श्वास घ्या, उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेऊन समोर डाव्या हाताच्या पंजाकडे वर उचला (उडवा). उजव्या पायाचा अंगठा डाव्या पंजाला लावा. श्वास सोडा आणि पाय खाली घ्या. डाव्या पायाने हीच कृती क्रमाने करा. - मानेचे व्यायाम तीन सर्वसाधारण श्वास घेऊन दोन्ही क्रिया क्रमाने आणखी तीन/पाच/सात/नऊ / अकरा / तेरा वेळा करा. व्यायाम प्रकार दोन भाग दोन पायामध्ये अंतर ठेऊन सरळ उभे राहा. दोन्ही हात कमरेवर ठेवा. कोपर खांद्याच्या सरळ रेषेत ठेवा. श्वास घ्या, डावा पाय डावीकडे दोन टप्प्यात जास्तीत जास्त वर उचला (उडवा.) - पायाचे व्यायाम श्वास सोडा. पाय जमिनीवर टेकवा. उजव्या पायाने हीच कृती क्रमाने करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन दोन्ही क्रिया क्रमाने आणखी तीन / पाच / सूर्यनमस्कार एक साधना १३६