पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांभाळायचा आहे. या योगासनाची उच्चतम अवस्था आहे मागील पायावर शरीराची उलटी कमान करून तोल सांभाळत दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेकवणे. हे सर्व प्रकार स्वाधिष्ठान चक्राच्या स्नायुंना लवचिकता देणारे, त्याची कार्यक्षमता वाढविणारे आहेत. कमरेचे स्नायु त्रास देत असतील तर हा व्यायाम प्रकार करायचा नाही हे लक्षात ठेवा. व्यायाम प्रकार एक पायामध्ये अंतर ठेऊन सरळ उभे राहा. खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही हात बाजूला उचला. पंजे जमिनीकडे ठेवा. श्वास सोडा, कमरेमध्ये खाली वाकून डाव्या पायाच्या अंगठ्याला उजवा हात लावा. डावा हात सरळ रेषेमध्ये वर उचलून धरा. - भाग दोन शरीर आतून वर उचला. कमरेतील ऊर्ध्व ताण स्वीकारा पार्श्वभाग, पोट मोकळे सोडा. थांबा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. व्यायाम प्रकार एक श्वास घेत पूर्व स्थितीला या. उजव्या पायाने ही क्रिया क्रमाने करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन दोन्ही क्रिया क्रमाने आणखी दोन वेळा करा. - भाग तीन सरळ उभे राहा. दोन पायात खांद्याचे अंतर ठेवा. हात शरीराच्या बाजूला ठेवा. उजव्या पंजाची मूठ करा. ती हळूहळू काखेकडे सरकवा. मूठ वर सरकवितांना शरीर डाव्या बाजूला वाकवा. उजवीकडील ताण स्वीकारा. हीच क्रिया विरुद्ध दिशेने करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन दोन्ही क्रिया क्रमाने आणखी दोन वेळा करा. मानेचे व्यायाम प्रकार सूर्यनमस्कार एक साधना - - भाग तीन - - १३५