पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांभाळणे. व्यायाम प्रकार तीन चवड्यावर ऊर्ध्वहस्तासन करणे. विशुद्धचक्र व स्वाधिष्ठानचक्र तसेच पाय याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार - व्यायाम प्रकार एक भाग एक पायामध्ये अंतर ठेऊन सरळ उभे रहा. खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही हात बाजूला उचला. पंजे समोर ठेवा. शरीर डावीकडे वळवून उजवा तळवा डाव्या तळव्यावर ठेवा. पावलांची स्थिती डावीकडे घ्या. दीर्घ श्वास घ्या, शरीराचे सर्व वजन उजव्या पायावर घ्या. नमस्कार स्थितीतील हात डोक्यावर घ्या. कमरेत वाकून शरीराची उलटी कमान करा. तोल सांभाळत जास्तीत जास्त वाकण्याचा प्रयत्न करा. छाती खांदे वर उचला. पाय, कंबर, छाती दिलेला ताण स्वीकारा थांबा. तीन सर्वसाधारण श्वास घ्या. मोकळे व्हा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास सोडत पूर्व स्थितीला या. उजव्या पायाने ही क्रिया क्रमाने करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन दोन्ही क्रिया क्रमाने आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा ही क्रिया घणाचे घाव घालणाऱ्या लोहाराची आहे. या आसनाला वीरभद्रासन हे नाव आहे. काल एक पाय पुढे घेऊन शरीराची कमान करून तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला. आजचा प्रकार मागील पायावर शरीराची उलटी कमान करून तोल - सूर्यनमस्कार एक साधना १३४