पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्येक वेळी गुरुवंदन श्लोक म्हणा व आपल्या आईचा उत्साही आनंदी चेहरा मन:पटलावर बघा. दीर्घश्वास घ्या आणि तळहात जमिनीवर ठेवा. दीर्घश्वास घ्या आणि तळहाताने जमिनीवर रेटा देऊन खांदे वर उचला. दीर्घश्वास घ्या आणि गुडघे वर उचलून लवणे व्हा. दोन्ही पाय सहा ते नऊ इंच हाताचे बाजूने पुढे सरकवा. दीर्घ श्वास घ्या. श्वास पकडा. स्वाधिष्ठान चक्र शक्य होईल तेवढे वर उचला. पुन्हा दीर्घश्वास घ्या आणि सरळ उभे रहा. ॥जय जय रघुवीर समर्थ ।। ।। श्रीरामसमर्थ ।। सरावसत्र दिवस तिसरा सूर्यनमस्कार पूरक योगासने / व्यायाम कालपर्यंत अभ्यास केलेले सूर्यनमस्कार पूरक योगासने / व्यायाम सर्व प्रकार क्रमाने करावयाचे आहेत. त्यांची फक्त उजळणी करायची आहे. प्रत्येक कृती एकदा करायची आहे. मी सूचना देणार नाही. प्रत्येक कृती शांतपणे, समजून-उमजून करा. काही अडचण असल्यास विचारा. कृतीचा क्रम खालीलप्रमाणे आहे - प्रकार एक सद्गुरू वंदन ( आनंदमुद्रा) अनाहतचक्र / विशुद्ध चक्र याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार व्यायाम प्रकार दोन ऊर्ध्वहस्त क्रिया भाग एक, दोन, तीन व्यायाम प्रकार दोन भाग एक अ) खांदे वर उचलणे खाली खेचणे, ब) खांदे उलट/सुलट फिरविणे, क) मुठीत वजन घेऊन काखेपर्यंत मुठवर उचलणे, मुठी सूर्यनमस्कार एक साधना - १३२