पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होणाऱ्या ऊर्जेतून अन्नाचे पचन होते. शरीराचे भरण पोषण संवर्धन होते. वायूचे ऊर्ध्व व अधस्थ मार्ग बंद होतात. शरीरातील मध्यप्रदेशावर ताण- दाब पडतो. येथील पेशींची स्फुरण पावण्याची क्षमता वाढते, त्याची लवचिकता कार्यक्षमता वृद्धिंगत होते. मार्जरासन - गुडघ्यावर उभे रहा. खाली वाकून कोपर गुडघ्यासमोर ठेवा. गुडघे, कोपर व पंजे यांच्यामध्ये खांद्याचे अंतर ठेवा. तळवे जमिनीवर दाबा व खांदे वर उचला. हात कोपर सरळ ठेवा. श्वास सोडत डोके खाली घ्या व शरीराची कमान करा. हाताने व गुडघ्याने जमीन खाली दाबा. स्वाधिष्ठान चक्र वर उचला. पार्श्वभाग मोकळा ठेवा. कमरेला बसलेला ताण स्वीकारा थांबा. ताण मोकळा करा. श्वास जोरात घ्या, डोके वर उचला. स्वाधिष्ठान चक्र खाली दाबा. ( शरीराची उलटी कमान करा.) स्वाधिष्ठान चक्राला मिळालेला आतल्या बाजूचा ताण स्वीकारा पार्श्वभाग मोकळा ठेवा. कमरेला बसलेला ताण स्वीकारा. थांबा. ताण मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन ही क्रिया याच क्रमाने आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा - स्वाधिष्ठान चक्राला उलट / सुलट तसेच एकदा ताण नंतर दाब द्यायचा आहे. त्याच बरोबर त्याला मिळणाऱ्या प्राणतत्त्वाचा पुरवठा वाढवायचा आहे. या दोन्ही क्रिया एकमेकांना पूरक आहेत. यामुळे मेरुदंडाची लवचिकता वाढते, त्याची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. एकूण कार्यक्षमता वाढते. सद्गुरुवंदन - - सद्गुरुवंदनाने दीर्घश्वसनाचा आजचा अभ्यास पूर्ण करू. सरावसत्र दिवस पहिला दिल्याप्रमाणे. सूर्यनमस्कार एक साधना - सूर्यनमस्कार - पूरक प्राणायाम यामध्ये - १३१