पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाणवते. २५ जुलै २०१०. एक ई-मेल - मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी मी सूर्यनमस्कार दररोज घालतो आहे. त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे जाणवत आहे. १५ नोव्हेंबर २०१०. एक ई-मेल - संकेतस्थळावर प्रथम सोपान यामध्ये आपण मार्गदर्शन केल्याप्रमाणे दोनच दिवसांपूर्वी सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केलेली आहे. सकाळी तीन व सायंकाळी तीन सूर्यनमस्कार घालते. मला आलेला अनुभव आश्चर्यकारक आहे. खरोखरच आश्चर्यकारक आहे. प्रत्येक दिवस उत्साह- शक्तीवर्धक असतो. ४ जानेवारी २०११. जागतिक सूर्यनमस्कार दिन रथसप्तमी २०११ या निमित्ताने पाच दिवसांचा (६ ते १० फेब्रुवारी २०११) विनामूल्य सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण यज्ञ श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक तर्फे आयोजित केला होता. या प्रसंगी माननीय समर्थवंशज परमपूज्य भूषण महारुद्र स्वामी (सज्जनगड, सातारा ) यांच्या हस्ते खालील व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री. उदय दिगंबर यार्दी, वय - ५१, साधारण दहा महिन्यामध्ये सूर्यनमस्कार साधनेत सातत्य ठेवून, संयमित आहार घेऊन वजन सात किलोने कमी केले. बी. पी. ची एक गोळी कमी झाली. श्री. रणजित वसंतराव श्रोत्रिय, वॉटरपोलो खेळाडू व प्रशिक्षक, वय ३६, साधारण चार महिन्याच्या कालावधीमध्ये सूर्यनमस्कार, इतर व्यायाम प्रकार यामध्ये सातत्य ठेवून संयमित आहार घेऊन दहा किलो वजन कमी केले. श्री. युवराज बाबुराव माने, वय - ३१, कोल्हापूर यांनी सहा तासामध्ये बाराशे बारा सूर्यनस्कार घालण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पान क्रमांक २५ वर याची नोंद वाचता येईल. ( आवृत्ती २०११ ) एक ई-मेल मागील आठवड्यामध्ये मान अवघडली, पाठीत चमक भरली. खाली बघणे किंवा खाली वाकणे कठीण झाले. वेदनाशामक औषधे, मलम यांनी तात्पुरते बरे वाटायचे. शेवटी घाबरत घाबरत वीस सूर्यनमस्कार, पंचवीस मिनिटांमध्ये जमेल तसे घातले. दोन तीन तासानंतर मला पूर्ण आराम सूर्यनमस्कार एक साधना XV