पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करा. (आता दोन्ही नाकपुड्या बंद आहेत.) आत घेतलेला श्वास छातीमध्ये पकडून ठेवा. मूलबंध - मल-मूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव पूर्णपणे वर उचलून धरा. ( मूलबंध लावा) मनातल्या मनात म्हणा ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि। धियायोनः प्रचोदयात्।। रेचक बंध सोडा म्हणजे मल-मूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव मोकळे सोडा. उजवा अंगठा बाजूला करून उजवी नाकपुडी उघडा. श्वास सोडण्यास सुरुवात करा. मनातल्या मनात ॐ आपोज्योतरसोमृतं ब्रह्मभूर्भुव: स्वरोम् ।। हा मंत्र म्हणा. - मंत्रोच्चार संपला तरी काही वेळ श्वास सोडण्याची क्रिया चालू राहाते त्याकडे लक्ष द्या, त्याचा आवाज ऐक प्रकार - ब प्राणायाम करतांना ( पुरक - कुंभक - रेचक) तेरा अक्षरी रामनामाचा उपयोग खालीलप्रमाणे करा. तेराअक्षरी मंत्र श्रीराम जयराम जयजय राम.. पूरक उजव्या हाताची बोटे प्राणायाम स्थितीमध्ये ठेवा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने सात टप्प्यामध्ये दीर्घ श्वास घ्या. श्वास घेतांना तो सलग घ्या. (थांबत किंवा धक्का देत घेऊ नका.) मनातल्या मनात मोजा ॐ - १, ॐ -२, ॐ - ३, ॐ-४, ॐ-५, ॐ-६, ॐ- ७. - कुंभक तर्जनी व मधले बोट कपाळावर ठेवा. अनामिकेने डावी नाकपुडी बंद करा. (आता दोन्ही नाकपुड्या बंद आहेत.) आत घेतलेला श्वास छातीमध्ये पकडून ठेवा. मूलबंध - मल-मूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव पूर्णपणे वर उचलून धरा. (मूलबंध लावा) मनातल्यामनात म्हणा || श्रीराम जयराम जयजय राम || हा मंत्रोच्चार करतांना त्याचे तीन भाग आवाहन, प्रतिष्ठापना व जयजयकार याकडे लक्ष ठेवा. - रेचक बंध सोडा म्हणजे मल-मूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव मोकळे सोडा. उजवा अंगठा थोडा दूर करून उजवी नाकपुडी उघडा. श्वास सोडण्यास सुरुवात सूर्यनमस्कार एक साधना १२९