पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कपाल भाती सरळ बसा. आरामात बसा. हात गुडघ्यावर ठेवा. पोट व श्वासपटल या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. नाकपुड्या व पोट यांचीच हालचाल होईल याकडे लक्ष द्या. इतर शरीर स्थिर ठेवा. श्वास घेऊन बलपूर्वक रेचक करा. पूरक बलहीन नैसर्गिक ठेवा. एका सेकंदाला एक बलपूर्वक रेचक असा वेग ठेवा. = सुरुवातीला १२ + ०१ चे बलपूर्वक रेचक आवर्तन एकदा करा. हळूहळू त्याची संख्या तीन आवर्तनांची करा. जास्तीत जास्त नऊ आवर्तने (१३ x ९ ११७) करण्यास हरकत नाही. यामध्ये बंध प्रकार येत नाही. म्हणून कपालभाती सुरक्षित व सोपा प्राणायाम प्रकार आहे. - काल आपण मूलबंध लावून आंतरकुंभक बघितला. आज आपण मूलबंध लावून बाह्यकुंभक तसेच उडियानबंध, जालंधरबंध यांचा सराव करणार आहोत. गायत्रीमंत्र व प्राणायाम याचा सराव करणार आहोत. हे सर्वच प्रकार एकदम सोपे आहेत. जेवढे सोपे आहेत तेवढेच महत्वपूर्ण आहेत. प्राणायाम ( मंत्रोच्चारित ) प्रकार अ - - प्राणायाम करतांना (पुरक- कुंभक - रेचक) गायत्री मंत्राचा उपयोग खालील प्रमाणे करा. (गाय=प्राण; त्री= त्राण, रक्षण, संवर्धन) - गायत्री मंत्र ॐ भूः, ॐ भुवः ॐ स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि । धियोयोनः प्रचोदयात्।। ॐ आपोज्योतीरसोमृतं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम्।। पूरक उजव्या हाताची बोटे प्राणायाम स्थितीमध्ये ठेवा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने सात टप्प्यामध्ये दीर्घ श्वसन घ्या. श्वास घेतांना तो सलग घ्या. ( थांबत किंवा धक्का देत घेऊ नका.) मनातल्या मनात म्हणा - ॐभूः, ॐ भुवः ॐस्वः ॐ महः, ॐजन: ॐ तपः, ॐसत्यम्. कुंभक – तर्जनी व मधले बोट कपाळावर ठेवा. अनामिकेने डावी नाकपुडी बंद - सूर्यनमस्कार एक साधना १२८