पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। मन-बुध्दी - शरीर 1- पूर्वार्ध भाग एक यामध्ये ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म असलेली सूर्यनमस्कार स्वयं साधना मनाने मनावर घ्यावी यासाठी त्याची मनधरणी केलेली आहे. उत्तरार्ध भाग दोन यामध्ये बुध्दीने या साधनेमध्ये सहभागी व्हावे यासाठी त्याची स्मृती जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मन-बुध्दीचे सामर्थ्य वापरून सूर्यनमस्कारातून शरीरशक्ती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न कसा करायचा याचे मार्गदर्शन कार्यपुस्तिकेमध्ये केलेले आहे. शरीराची शक्ती व मन-बुध्दीचे सामर्थ्य म्हणजेच शीव आणि शक्ती आहे. शरीरामध्ये असलेल्या या ब्रह्म-मायेचे ऐक्य झाल्यावर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हेच सूर्यनमस्काराचे अधिष्ठान आहे. व्यावहारिक दृष्टीने हेच आपले उद्दिष्ट आहे. ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। सूर्यनमस्कार एक साधना १२६