पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(श्वासपटल) जाणवेल. लक्ष मणिपूर चक्राकडे ठेवा. अर्थात यासाठी प्रदीर्घ सरावाची गरज आहे. दीर्घश्वसनाचे प्रकार तसेच स्वाधिष्ठान व मणिपूर चक्राचे स्नायू कार्यरत करण्यासाठी केलेले व्यायाम प्रकार या आसनामध्ये उपयोगी ठरतात. मानेचे पोटाचे विकार असणाऱ्यांनी कमीतकमी बळाचा वापर करून हे आसन करा. वैद्यकीय सल्ला घ्या. समर्पणाचा श्लोक आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वंति दिने दिने जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।। नमोधर्मविधानाय नमस्ते कृतसाक्षिणे नमः प्रत्यक्षदेवाय भास्कराय नमोनमः ।। कचर हे सूर्यनारायणा! तू सर्व धर्मतत्त्वाचे विधान आहेस, (दैवी गुणसमुच्चयाचा धारणकर्ता आहेस.) धर्माचे आश्रयस्थान आहेस. हे सर्वसाक्षी परमेश्वरा!! माझ्या सर्व चांगल्या वाईट कर्मांचा तू साक्षीदार आहेस. हे प्रत्यक्ष परमेश्वरा!!! तुला मी वारंवारा मनोभावे नमस्कार करतो. अन्वयार्थ - सूर्यदेवता ही सर्व दैवी गुणांचा समुच्चय आहे. सर्व गुणांचे विधान आहे. आश्रयस्थान आहे. प्रत्यक्ष कृतीतून तो आपल्याला धर्माची शिकवण देतो. सर्व देवतांमध्ये फक्त सूर्यनारायणाचे गुण-रूप-आकार आम्हाला उगोचर आहे. हा प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या सर्व शारीरिक, मानसिक कृती-कर्मांचा साक्षीदार आहे. आपल्या कर्माच्या गुणवत्तेप्रमाणे सुख दुःख प्रदान करणारा प्रत्यक्ष परमेश्वर आहे. या प्रत्यक्ष परमेश्वराला मी वारंवार मनोभावे नमस्कार करतो. अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनं सूर्य पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं ।। जगातील सर्व समर्थ भक्त व सूर्यनमस्कार साधक यांना माझा साष्टांग नमस्कार. ॥जय जय रघुवीर समर्थ ।। • सूर्यनमस्कार एक साधना १२५