पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेऊन, कोपरात वाकून, छाती जमिनीला टेकविणे हा एक भाग झाला. घोट्याचा वापर पुलीसारखा करून शरीर पुढे ओढून वर घेणे हा दुसरा भाग झाला. - तृतीय कौशल्य - हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरुत्वमध्ये बिंदू) मणिपूर चक्रापासून जमिनीवर लंबरेषेत ठेवा. चवडे, गुडघे, छाती यांचा आधार घ्या. मकरासन, साष्टांगनमस्कारासन, भुजंगासन या आसनातील डौल साधण्याचा प्रयत्न करणे. तसेच श्वासाचा नाद व शरीर कृतीची लय साधणे याचा प्रयत्न या कौशल्यामध्ये अभिप्रेत आहे. अन्नरसाचे रुपांतर ऊर्जेमध्ये / रक्तामध्ये करणारा महत्वाचा अवयव यकृत आहे. जठराचे आकारमानही मोठे आहे. 8 मणिपूर चक्र विष्णूचे अधिष्ठान असलेले चक्र आहे. आपल्या शरीराचे भरण-पोषण-संवर्धन करणारी, कार्यसंचलन करणारी ही शक्ती आहे. या चक्राकडे लक्ष देऊन काया-वाचा-मनाने वैश्विकशक्तीला शरण जाणे हे या आसनातील कौशल्य. स्नायूक्षोभ गुडघे आणि छाती जमिनीवर ठेऊन पोट-कंबर वर उचलतांना अनावश्यक व चुकीचा ताण दिल्यास हे स्नायू लगेच बोलायला लागतात. आसन करण्यामध्ये चूक झाली हा संदेश लगेच देतात. पुढील सूर्यनमस्कारामध्ये हे आसन हळूवारपणे, जोर न लावता करा. सावधान - या आसनामध्ये गुडघे छाती जमिनीवर टेकविणे, हनुवटी छातीला लावणे याचा सराव प्रथम करा. नंतर स्वाधिष्ठान चक्र वर उचलून धरण्याचा सराव करा. त्या नंतर मणिपूर चक्राकडे लक्ष देऊन पोट आतमध्ये शक्य होईल तेवढे वर ओढा. हा ताण सुरुवातीला पोटाच्या मध्यभागी जाणवेल. हळूहळू सराव जसा वाढेल तसा हा ताण ओटीपोटाच्या खालील टोकापासून पोटाच्या वरील टोकापर्यंत 8 प्राण- अपान एकत्र येण्याचे शरीरातील हे एकमेव केंद्र. अणूचे विघटन झाल्यावर जशी अणूशक्ती तयार होते त्याप्रमाणे प्राण-अपान एकत्र आल्यावर जी शक्ती निर्माण होते त्यामुळे आपले भरण-पोषण-संवर्धन या क्रिया घडून येतात. सूर्यनमस्कार एक साधना १२४