पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येतो. या विकारांवर वैद्यकीय उपचार चालू असल्यास रोगमुक्ती कमी कालावधीत व कायमस्वरूपी मिळते. आरोग्य सुधारते. तेजस्वी डोळे, नितळ चेहरा, लांब काळेभोर केस हे आरोग्यधन प्राप्त होते. सशक्त शरीरामुळे कामाचा उत्साह वाढतो. स्वस्थ मन, स्व-स्थित असलेले मन, बुद्धीच्या मदतीने प्रत्येक कार्य यशस्वीपणे संपन्न करतो. साष्टांगनमस्कारासन कृती श्वास सोडतांना कोपरात । वाकून शरीर जमिनीवर टेकवा. (कपाळ, छाती, पोट, गुडघे, चवडे) कोपर शरीराजवळ घ्या. हनुवटी छातीला लावा. गुडघे व घोटे एकमेकाजवळ घ्या. श्वास सोडा आणि शरीराचा मध्यभाग वर उचला. मणिपूर चक्राकडे लक्ष द्या. पोट-ओटीपोटाचा भाग आतमध्ये ओढून शक्य होईल तेवढा वर उचला. साष्टांगनमस्कारासन पार्श्वभाग ताणरहीत ठेवा. छातीचे स्नायू मोकळे करा. या स्थितीमध्ये थोडं थांबल्यासारखे करा. स्नायूंचा दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. जमिनीला टेकलेले गुडघे टेकलेलेच ठेवा. पंजाने जमिनीला रेटा द्या. खांदे वर उचला. कोपर सरळ करा. आराम करा. (विश्रांती स्थिती.) साष्टांगनमस्कारासन कौशल्य प्रथम कौशल्य पोटावर झोपा. कपाळ, हनुवटी, हात, कोपर, घोटा गुडघा, यांची योग्य स्थिती घ्या. श्वास सोडत ओटीपोटापासून श्वासपटलापर्यंतचा भाग वर उचला. पार्श्वभाग मोकळा ठेवा. सहज शक्य होईल तेवढा वेळ थांबा. ताण मोकळा करून पूर्ण शरीर जमिनीवर टेकवा. - द्वितीय कौशल्य - मकरासनातून साष्टांगनमस्कार आसनात येतानाच, भुजंगासनास सुरुवात करणे या कौशल्याचा समावेश या प्रकारात येतो. दोन्ही खांदे मागे सूर्यनमस्कार एक साधना १२३