पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे आसन श्वास सोडून बलपूर्वक करा. पंजाने जमिन रेटा, खांदे वर उचला, घोट्याचा वापर पुलीसारखा करून शरीर मागे खेचा मान पकडा, विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. " स्नायूक्षोभ - खांदे, मनगट, घोट्यांचे स्नायुवर अनावश्यक व चुकीचा दाब दिल्यास हे स्नायू दुखण्यास सुरुवात होते. पहिल्या दिवशी केलेला सर्व व्यायाम प्रकार करा. मानेचा व्यायाम करा. हे आसन करतांना विशुद्ध चक्राकडे संपूर्ण लक्ष द्या. त्रास होत असल्यास फक्त मुद्रा किंवा द्विपाद प्रसरणासन हा प्रकार करा. उतार वय, अशक्तपणा असल्यास, दंडामध्ये इजा असल्यास हे आसन जपून करा. सावधान गतीयुक्त सूर्यनमस्कारामध्ये अश्वसंचालनासन व पुढील साष्टांगनमस्कारासन श्वास सोडतांना (श्वास पूर्ण सोडून झाल्यानंतर) करायचे आहे. आपण नियंत्रित सूर्यनमस्काराचा विचार या ठिकाणी करतो आहोत. सूर्यनमस्काराचा विचार या ठिकाणी करतो आहोत. सुरुवातीला द्विपाद प्रसरणासन करा. शरीर तिरक्या स्थितीमध्ये स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू कौशल्य जसे वाढेल तसे मकरासनातील प्रत्येक क्रिया बलपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. घोट्याचा वापर करून शरीर शक्य तेवढे मागे खेचण्याचा प्रयत्न करा. सूर्यमंत्र- ॐ पूष्णे नमः आसनाचा उद्देश - प्रत्येक आसन वचसा-मनसा- दृष्ट्या करायचे आहे. शरीराचा मध्यभाग शक्य होईल तेवढा वर उचलायचा आहे. शरीराने वापरलेले प्राणतत्त्व पूर्णपणे बाहेर सोडून निर्वात झालेले पोट आतमध्ये उचलून मेरूदंडापर्यंत ओढायचे आहे. वारंवार ही क्रिया करून पोटाच्या स्नायूंची लवचिकता वाढवायची आहे. मणिपूर चक्राकडे मन एकाग्र करायचे आहे. आरोग्य लाभ - दमा, मूळव्याध, संधीवात, अपचन इत्यादी विकारांना प्रतिबंध घालता सूर्यनमस्कार एक साधना १२२