पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रयत्न सुरू आहे. १९ जुलै २००८, शिकागो, अमेरिका. पंधरा दिवसांपासून सूर्यनमस्कार / योगासन त्यानंतर ध्यानधारणा करते आहे. जप व ध्यानधारणेमध्ये आश्चर्यकारक प्रगतीचा अनुभव येतो आहे. १६ ऑगस्ट २००८, शिकागो, अमेरिका. - एक ई-मेल - मी आपले संकेत स्थळ www.suryanamaskar.info वाचले. अनेक कारणामुळे हे संकेतस्थळ सूर्यनमस्कार संकेतस्थळातील सर्वात उत्तम संकेतस्थळ आहे. त्याप्रमाणे सूर्यनमस्कार घालते. मुलांना शिकविते. आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल अभिनंदन. २० डिसेंबर २००९, टोकियो, जपान. एक ई-मेल मी आय. आय. टी. चा विद्यार्थी. सूर्यनमस्कार साधनेच्या भक्तीतून डोकेदुखी (Migraine), त्वचारोग इत्यादी शारीरिक व्याधीतून मुक्तता मिळाली. मानसिक तणाव असतांनाही आता मी शांत राहू शकतो. माझा मनस्वी / स्वच्छंदी स्वाभव कमी झाला आहे. माझी आकलन शक्ती वाढली आहे. हा फायदा कायम स्वरुपी व वृद्धिंगत होणारा आहे. आपले अभिनंदन! २७ फेब्रुवारी २०१०. एक ई-मेल आपण प्रसिद्ध केलेले संकेतस्थळ एक महिन्यापूर्वी वाचनात आले आणि मी अंतर्बाह्य बदललो. सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात केली आणि माझे आयुष्यच संपूर्णपणे बदलून गेले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या रागीट स्वभावावर मला अंकूश ठेवता येतो. दिवसभर सुस्पष्ट आशावाद, उत्साह व आत्मविश्वास यामध्ये प्रत्येक दिवस व्यतित होतो. माझ्या दिनक्रमातून यशाचे संकेत मला मिळत असतात. सूर्यनमस्कार साधना हाच माझा देव झालेला आहे. आपले अनेकानेक आभार. २७ फेब्रुवारी २०१०. - एक ई-मेल - मला (वय वर्षे २५) पॉलीसिस्टिक ओव्हरीन (Polycys- tic Ovarian Disorder) चा त्रास आहे. वजन वाढते आहे. मासिक पाळीत अनियमितता आहे. एक महिना झाला मी सूर्यनमस्कार नियमितपणे घालते आहे. माझे वजन दोन किलोने कमी झाले आहे. आणखी मला कोणते फायदे होतील ते कळवावे. आभार. - एक ई-मेल - सूर्यनमस्कार घालतांना ओटीपोटात अतिउष्णता जाणवायची. हळूहळू आपोआप कमी होत गेली. माझ्या रागीट स्वभावात बदल होतो आहे हे सूर्यनमस्कार एक साधना xiv