पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दृष्टी काटकोनात जमिनीवर ठेवा. विशुद्ध चक्राकडे मन एकाग्र करा. या स्थितीमध्ये थोडं थांबा. स्नायूंचा दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. मकरासनातील कौशल्य - प्रथम कौशल्य - मुद्रा स्थिती हे प्रथम कौशल्य. अगोदरच्या आसनामध्ये काही त्रास झाला असल्यास तो या विश्रांती आसनात लक्षात येतो. शक्य होईल तेवढी शरीराची तिरकी स्थिती घेऊन ताणरहीत अवस्थेत थांबा. - द्वितीय कौशल्य - द्विपाद प्रसरणासन हे दुसरे कौशल्य. दोन्ही पाय शक्य होईल तेवढे मागं घ्या. खांदे व हाताचे पंजे सरळ रेषेत ठेवा. तिरक्या शरीर स्थितीमध्ये स्थिर राहा. पार्श्वभाग वर उचलला जाणार नाही याची काळजी घ्या. तृतीय कौशल्य हे आसन करतांना शरीराचे वजन ( गुरुत्वमध्य ) विशुद्धचक्रापासून जमिनीवर हातांच्या दोन पंजामध्ये लंबरेषेत ठेवा. दोन्ही चवड्यांचा फक्त आधार घ्या. 6 ' मकरासन स्थिती ही तिसरे कौशल्य. मगरीची जमिनीवरील चाल लक्षात घेतली की हे आसन लक्षात येते. व्यायाम प्रकारामध्ये आपण घोट्याचा वापर पुली सारखा करून चवड्यावर उभे राहतो. शरीर बाहेरून व आतून वर उचलण्याचा प्रयत्न करतो. या सरावातून मकरासन करण्याचे कौशल्य वाढविता येते. एक कृती उभे राहून दुसरी शरीराची आडवी स्थिती ठेवून करायची आहे. 7 दोन्ही कृतीमध्ये सारखेपणा असला तरी शरीराला मिळणारा ताण- दाब वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्वसनप्रक्रिया यामध्येही वेगळेपण आहे. 6 मगर हा विशाल व वजनदार सरपटणारा प्राणी आहे. तिच्या मानेची ठेवण व ताकद वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती खांद्याचा वापर करून शरीराचे वजन पुढील दोन पायावर घेते आणि मग दुडक्या चालीने पुढे सरकते. 7 या आसनाची दमदार स्थिती घेतल्यावर दुसरा साधक तुमच्या टाचेवर उभे राहून, हळूवारपणे, सावकाश तुमच्या शरीरावर चालत जाऊन, डोक्यावरून आरामात उतरू शकतो. (या आसनात वापरलेली ताकद लक्षात घ्या. प्रयोग करू नका. ) सूर्यनमस्कार एक साधना १२१