पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येईल. यानंतरचे मकरासन, साष्टांगनमस्कारासन, पर्वतासन व्यवस्थित करा. ही आसने व्यवस्थित केल्यास स्नायूंना दिलेला चुकीचा ताण मोकळा होण्यास मदत होईल. उतावरवय व अशक्तपणा असल्यास अर्धभुजंगासनाचा सराव करण्याचा प्रयत्न करू नका. डोळ्याला लेन्स लावलेल्या असल्यास त्या काढून ठेवा. पाठीच्या मणक्यातील अंतर कमी झाले असल्यास हे आसन करू नका. वैद्यकीय सल्ला घ्या. सूर्यमंत्र- ॐ खगाय नमः आसनाचा उद्देश - शरीराचे सर्व वजन हात आणि खांद्यावर घेणे. (पायांचा फक्त आधार घेणे.) शरीराचे सर्व वजन हातावर घेऊन खांदे वर उचलणे. घोट्याचा वापर करून शरीराला खालच्या दिशेला ताण देणे. विशुद्ध चक्राकडे मन एकाग्र करणे. आरोग्य लाभ - ऊर्ध्वहस्तासन (विशुद्धचक्र) प्रमाणे. मकरासन कृती श्वास घ्या. छातीमध्ये पकड़ा. उजवा पाय उचलून डाव्या पायाला लागून ठेवा. खालील कृती श्वास सोडत किंवा पूर्ण श्वास सोडल्यावर करा. मकरासन दोन्ही गुडघे व घोटे एकमेका जवळ घ्या. दोन्ही तळव्यांनी जमिन जोर लावून खाली दाबा. जेवढे शक्य होईल तेवढे खांदे वर उचला. 112 हाताचे तळवे व खांदे एका रेषेमध्ये येतील हे बघा. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. पार्श्वभाग मोकळा ठेवा. चवड्याचा पक्का आधार घेत दोन्ही घोट्यांचा वापर करून शरीर मागे खेचा. डोक्यापासून पायापर्यंत शरीर तिरक्या स्थितीमध्ये ठेवा. मान आणि पोटऱ्यावरील ताण स्वीकारा. सूर्यनमस्कार एक साधना १२०