पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकपाद प्रसरणासन व अश्वसंचालनासन या आसनांचा चांगला सराव झाल्यानंतर अर्धभुजंगासन या आसनाचा प्रयत्न करण्यात हरकत नाही. डावा गुडघा जमिनीपासून थोडा वर घेऊन श्वास घेऊन कमरेची लवचिकता अजमवा. उजव्या पायाचा तळवा जमिनीवर पूर्ण टेकवा. शरीरावरील अनावश्यक ताण काढा. तैयार स्थिती घ्या. शरीर मागील बाजूला ढकला. कमरेच्या स्नायुंची लवचिकता लक्षात घेऊन मेरूदंडाला मागील दिशेला ताण द्या. या आसनात उजव्या पायावर बसल्यामुळे मांडीचा दाब यकृतावर पडतो. डाव्या बाजूला म्हणजे प्लीहे वर ताण बसतो. आदित्याय नमः हा सूर्यमंत्र म्हणतांना याच्या उलट ताण व दाब मिळतो. स्नायूक्षोभ - या आसनामध्ये अनावश्यक व चुकीचा ताण दाब दिला गेल्यास तो लगेच ओळखता येतो. कमरेच्या डाव्या किंवा उजव्या बाजूचे स्नायू दुखत असल्यास हा या आसनाचा प्रताप आहे असे समजावे. यामध्ये मनगट, घोटा, पोटावरील स्नायुंमध्ये सुद्धा वेदना सुरू होण्याची शक्यता असते. सावधान हे आसन चांगले जमण्यासाठी अजिबात घाई करू नका. अनावश्यक आणि चुकीचा ताण-दाब तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. आसन स्थिती घेतांना प्रथम उजव्या पायाच्या करंगळीजवळ उजव्या हाताचा अंगठा ठेवा. हात आणि खांदे सरळ रेषेत आणा. हातामध्ये खांद्याचे अंतर ठेवा. मान मागे घ्या. सर्व शरीर मोकळे करा. मुद्रा स्थितीमध्ये थांबा. हे आसन करतांना आज्ञाचक्राकडे संपूर्ण लक्ष द्या. प्रथम एक पाद प्रसरणासन याचाच फक्त सराव करा. उजव्या बाजूच्या शेवटच्या दोन बरगड्या, मांडी व पोटरी एकमेकांजवळ आणण्याचा फक्त प्रयत्न करा. तैयार स्थिती घ्यायच्या अगोदर शरीरावरील अनावश्यक ताण-दाब कमी करा. श्वास घेऊन मान मागे ढकला. डोळे आढ्याकडे / आकाशाकडे घ्या. हस्तपादासन सराव जसा वाढेल तशी या आसनामधील सहजता साधता सूर्यनमस्कार एक साधना ११९