पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काटकोनात घेण्यासाठी शरीर वर उचला. (विश्रांती स्थितीमध्ये या.) अश्वसंचालनासन कौशल्य प्रथम कौशल्य एकपाद प्रसरणासन हे या आसनातील प्राथमिक कौशल्य आहे. एक पाय मागे दुसरा पुढे या स्थितीत बसा. हाताचा फक्त आधार घ्या. ( शरीराचे वजन त्यावर घेऊ नका.) - - मागचा पाय अधिक मागे ढकलता येतो का ते बघा. गुडघा जमिनीवर टेकवा. शरीराचा तोल सांभाळत हात हळूच उचला, हाताची घडी घाला. छातीवर ठेवा. (हात जमिनीवर टेकल्याशिवाय मान मागे ढकलता येणार नाही.) द्वितीय कौशल्य याच आसनाचे दुसरे नाव 5 अश्वसंचालनासन असे आहे. हे नावच या आसनातील प्रगत क्रिया सुस्पष्ट करणारे आहे. हाताची घडी सोडा. हात जमिनीवर फक्त आधारासाठी टेकवा. गुडघा टेकलेला तसाच ठेवा. श्वास घ्या. टेकलेला डावा चवडा, गुडघा व उजवे पाऊल यावर शरीराचे वजन घ्या. स्पर्धेमध्ये धावण्यास ‘तैयार’ ही स्थिती आतून घेण्याचा प्रयत्न करा. शक्य होईल तेवढी मान मागे ढकला. चांद्रनमस्कारामध्ये हे आसन करतांना हात जमिनीवर टेकलेले नसतात. ते नमस्कार स्थितीमध्ये डोक्यावर ताणलेले असतात. याला ऊर्ध्वहस्त बैठक असे म्हणता येईल. - तृतीय कौशल्य - हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरुत्वमध्य ) आज्ञाचक्र - विशुद्ध चक्रापासून जमिनीवर उजव्या पायाजवळ लंबरेषेत ठेवा. डावा गुडघा व चवडा यांचा आधार घ्या. अर्धभुजंगासन हे या आसनातील अंतिम कौशल्य म्हणता येईल. 5 आपल्या आयुष्याचा लगाम सख्याहरी श्रीकृष्णाच्या हातात आहे. त्याने इशारा केल्यावर तत्क्षणी धावायला सुरुवात करायची आहे. सूर्यनमस्कार एक साधना ११८