पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आरोग्य लाभ श्वसनाचे विकार, रक्तदाब, मानसिक तणाव प्राथमिक स्वरुपात असल्यास आराम मिळतो. या आसनाचा प्रभाव मज्जासंस्थेवर होतो. विचारप्रणाली सुस्पष्ट होते. मेंदू तल्लख होतो. मन एकाग्र करणे सहज जमते. कोणतेही काम सहजपणे आत्मविश्वासाने करता येते. घोटे, पोटऱ्या, गुडघे, मांड्या, कंबर, पाठ, मान यातील स्नायू मोकळे होतात. अश्वसंचालनासन कृती - दोन्ही हात व उजवा पाय जमिनीवर तसाच ठेवा. दोन हातामध्ये खांद्याचे अंतर आहे याची खात्री करा. श्वास घेऊन डावा पाय उचलून मागे घ्या. उजवा गुडघा काटकोनात ठेवा. उजवी टाच जमिनीवर टेकवा. (ही विश्रांती स्थिती) अश्वसंचालन दोन्ही हात तसेच काटकोनातील उजवा पाय व डाव्या पायाचा चवडा यांचा वापर करून शरीर मागे खेचा. डावा पाय खुब्यातून मागे खेचा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. याचवेळेस उजव्या पायाची टाच व चवडा जमिनीवर टेकवून बसण्याचा प्रयत्न करा. उजव्या पायाची पोटरी, मांडी आणि शेवटची बरगडी जवळ आणण्याचा प्रयत्न करा. डावा गुडघा जमिनीला टेकवा. उजवा पाय जमिनीवर संपूर्ण टेकण्यासाठी डावा पाय खुब्यातून मागे खेचण्याचा आणखी एकदा प्रयत्न करा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. शरीराचे वजन दोन्ही पायांवर घ्या. हाताचा फक्त आधार घ्या. पार्श्वभाग, पाठ, कंबर यांचे स्नायू, संपूर्ण लक्ष देऊन, ताणरहीत करा. दीर्घ श्वास घ्या. अज्ञाचक्राकडे मन एकाग्र करा. ते सूर्यासमोर ठेवा. डोळ्यातील बुबुळे कपाळाकडे सरकवा. मान पाठीमागे ढकला. खांदे मागे खेचा. विशुद्धचक्र खांद्यामध्ये पकडा. थांबा. ताण स्वीकारा. मानेच्या स्नायुंना दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. उजवा गुडघा सूर्यनमस्कार एक साधना ११७