पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हात उभे रहा. चवड्यापासून हातांच्या बोटापर्यंत शरीर वर उचलून धरा. तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा. ताण स्वीकारा थांबा. श्वास सोडत टाचा टेका. पूर्व स्थितीला घ्या. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन ही क्रिया याच क्रमाने आणखी दोन वेळा करा. उंच उडी प्रकार एक + दोन- एक) १२ + ०१ उंच उड्या मारावयाच्या आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी उड्या किंवा उंच उड्या मारा. इतरांनी उड्या मारल्या सारखे करा. दोन) १२ + ०१ उंच उडी मारून हात खांद्याच्या रेषेत वर उचला. ०६ + ०६ + ०१ या संख्येने दोन्ही प्रकारच्या उड्या मारता येतील. सद्गुरु वंदन सद्गुरु वंदन (आनंदमुद्रा) - पूरक व्यायाम प्रकार एक प्रमाणे. ॥जय जय रघुवीर समर्थ || - सूर्यमंत्र- ॐ भानवे नमः आसनाचा उद्देश - ।। श्रीरामसमर्थ ।। सरावसत्र दिवस दुसरा साधकांसाठी सूर्यनमस्कार डाव्या पायाला खालच्या दिशेने ताण देणे. धावण्याच्या शर्यतीमध्ये 'तयार' राहाण्याची स्थिती घेणे. शरीराचे वजन पायांवर, हाताचा फक्त आधार घेणे. स्वाधिष्ठान चक्राची लवचिकता वाढविणे. छाती वर उचलणे. मान पाठीमागे ढकलणे. अज्ञाचक्राकडे मन एकाग्र करणे. आज्ञाचक्र सूर्यासमोर ठेवणे. सूर्यनमस्कार एक साधना ११६