पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आतल्या बाजूला ओढून धरा. पोटरीवर पडणारा ताण स्वीकारा. लक्षात ठेवा चवड्यावर उचं उभे राहणे, तोल सांभाळणे, पार्श्वभाग मोकळा ठेवणे या क्रिया महत्वाच्या. यासाठी काहीतरी आधार (काठी वगैरे) घेतल्यास कृती परिणामकारक पद्धतीने करता येते. चवडा उचलून धरल्यावर सर्व शरीराला ऊर्ध्वताण द्यायचा आहे. शरीरातील इतर स्नायूंवर अनावश्यक ताण असल्यास तो काढून टाकणे महत्त्वाचे आहे. मकरासन करतांना हीच क्रिया शरीर आडव्या स्थितीत असतांना करावयाची आहे. व्यायाम प्रकार दोन भाग तीन सरळ उभे रहा. हात शरीराजवळ ठेवा. डावा पाय पुढे ठेवा. पुढे झुकून शरीराचे सर्व वजन डाव्या पायावर घ्या. उजवा पाय सावकाश वर उचला, दोन्ही हात वर उचला. कमरेमध्ये वाका. दोन्ही हात पुढे - उजवा पाय मागे ठेवून तोल सांभाळण्याचा प्रयत्न करा. - - शरीरावर अनावश्यक ताण असल्यास काढून टाकण्याचा प्रयत्न करा. ताण स्वीकारा. थांबा. मोकळा करा. हळूच पूर्वस्थितिला या. उजवा पाय पुढे घेऊन ही क्रिया क्रमाने करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन या दोन्ही क्रिया याच क्रमाने आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा - अर्धभुजंगासन शिकण्याची ही सुरुवात आहे. उद्याला दोन टप्प्यामध्ये याचा अधिक सराव करायचा आहे. हा सराव जसा वाढेल तसा काठीच्या आधाराची आवश्यकता लागणार नाही. व्यायाम प्रकार तीन सरळ उभे राहा. हात शरीराजवळ ठेवा. श्वास घेत हात नमस्कार स्थितीमध्ये घेऊन डोक्यावर घ्या. हात वर घेत असतांनाच पायाच्या चवड्यावर सूर्यनमस्कार एक साधना ११५