पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यायाम प्रकार दोन भाग एक अ) सरळ उभे रहा. हात शरीराजवळ ठेवा. डावा पाय गुडघ्यात मुडपून घोटा डाव्या हातात धरा. टाच पार्श्वभागाला टेकवा. दोन्ही गुडघे सरळ रेषेत ठेवा. शरीर वर उचलून धरा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. डावी टाच पार्श्वभागाला टेकविण्याचा आणखी एकदा प्रयत्न करा. मांडीवर पुढील बाजूवर पडलेला ताण स्वीकारा. इतर ठिकाणी ताण असल्यास तो काढून टाका. ताण स्वीकारा. थांबा. मोकळा करा. उजव्या पाय व उजवा हात वापरून हीच क्रिया क्रमाने करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन या दोन्ही क्रिया याच क्रमाने आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा - तोल सांभाळणे एका पायावर उभे राहून तोल सांभाळणे आणि पार्श्वभाग मोकळा ठेवणे या दोन क्रिया महत्त्वाच्या. यासाठी काहीतरी आधार (काठी वगैरे) घेऊन उभे राहा. घोटा वर उचलून धरल्यावर मांडीच्या पुढील बाजूवर पडलेला ताण पकडण्याकडे लक्ष द्या. सूर्यनमस्कार करतांना अपेक्षित स्नायूंवर पडणारा ताण या प्रकारचा असतो. शरीरातील इतर स्नायूंवर अनावश्यक ताण असल्यास तो काढून टाकणे महत्त्वाचे आहे. व्यायाम प्रकार दोन भाग दोन - सरळ उभे राहा. हात शरीराजवळ ठेवा. पायांच्या चवड्यावर शरीर वर तोलून धरा. शक्य होईल तेवढे शरीर वर ताणून धरा. शरीराचा तोल सांभाळा. (आधारासाठी काठीचा आधार घ्या.) शरीरावर अनावश्यक ताण असल्यास काढून टाकण्याचा प्रयत्न करा. ताण स्वीकारा. थांबा. मोकळा करा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन या दोन्ही क्रिया याच क्रमाने आणखी दोन वेळा करा. सरळ उभे रहा. हात शरीराजवळ ठेवा. टाचेवर उभे रहा. शरीर वर उचलून धरा. घोट्याचा उपयोग करून पाऊल सूर्यनमस्कार एक साधना ११४