पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

‘सर्वत्र प्रस्थापित झालेल्या पाश्चिमात्य आयुरारोग्यशास्त्राला शरण गेलेल्यांची दृष्टी या ग्रंथाचे (सूर्योपासना आणि प्राणायाम, लेखक डॉ. र. कृ. गर्दे) अभ्यासाने निवळण्यास खात्रीने मदत होईल'..... महामहोपाध्याय प्रा. दत्तो वामन पोतदार यांनी डॉ. र. कृ. गर्दे यांना दिलेला हा पुरस्कार (आशीर्वाद ) आहे. सन १९५६. मी दररोज दोनशे पन्नास सूर्यनमस्कार घालत होतो म्हणूनच कॉलेजमध्ये असतांना पोहण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला (पोहण्याचा फारसा सराव नसतांनाही) आणि स्पर्धेमध्ये विक्रम करता आला. लेखक - न्या. राम केशव रानडे, सदर- जीवन-गीता, श्री सूर्यदैवत विशेषांक, प्रसाद, सन १९७६ ऑगस्ट. - गुडघ्याचा संधीवात हा त्रासदायक रोग मी नमस्कारांच्या सहाय्याने बरा केला. गेली वीस वर्षे ६ नंबरचा चष्मा सतत सातत्याने वापरत आहे. १९८१ ते १९८५ या काळातील सूर्यनमस्काराच्या सरावातून त्याचा वापर फक्त दहा टक्के शिल्लक आहे. श्री. म. म. जोशी, जानेवारी १९८५. - एक अनुभव - अनेक वर्षे एकशे पंचवीस सूर्यनमस्कार घालणारे माझे एक नातेवाईक आनुवंशिक दम्याच्या आजारातून कायमचे बरे झाले. त्याच्या एकाही मुलामध्ये या आजाराचे लक्षणही पुढे दिसत नाही. श्री. दि. मा. प्रभुदेसाई. १९९६. - माझा स्वत:चा अनुभव - १) मला वातकंपाची देणगी आजोबा व मातूल घराणे दोन्ही कडून मिळालेली आहे. २) अॅलर्जी, अपचन, अंगावर चट्टे, खाज याचा त्रास होता. हिस्टोग्लोब्लिन इंजेक्शन व औषधांचा कोर्स साधारण दोन वर्षानंतर पुन्हा घ्यावा लागत होता. मध्यंतरात कुपथ्य झाल्यास औषधे चालू होतीच. ३) पचनाच्या विकारातून तंबाखु ओढण्याची वाईट सवय अनेक वर्षे चालू होती. गेली दहा वर्षे श्रद्धेने समंत्रक सूर्यनमस्कार पद्धतशीरपणे घालत आहे. या तीनही व्याधी विकारातून आज मी पूर्णपणे मुक्त आहे. लेखक आणि www.suryanamaskar.info सुभाष खर्डेकर. २०११. - एक ई-मेल दररोज पूजा करण्या अगोदर सूर्यनमस्कार नियमितपिणे घालते. त्यामुळे माझी श्वसनक्रिया सुधारली, एकाग्रता वाढली, ध्यानाच्या वेळेत दुपटीने वाढ झाली. विचारपूर्वक चांगल्या पद्धतीने सूर्यनमस्कार घालण्याचा सूर्यनमस्कार एक साधना xiii