पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चक्राला मिळालेला ताण पकडा. तो स्वीकारा. ताण मोकळा करा. श्वास घेत पूर्व स्थितीला या. श्वास सोडा. पाय जमिनीवर रोवा. कमरेतून उजवीकडे वळा. श्वास सोडण्याकडे लक्ष देऊन उजवीकडे अधिक वळण्याचा प्रयत्न करा. स्वाधिष्ठान चक्राला मिळालेला ताण पकडा. तो स्विकारा. ताण मोकळा करा. श्वास घेत पूर्व स्थितीला या. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन ही क्रिया आणखी दोन वेळा करा. व्यायाम प्रकार एक भाग दोन सरळ उभे रहा. दोन पायांमध्ये अंतर ठेवा. हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. दीर्घश्वास घ्या. दोन्ही हात डोक्यावर ताणून धरा. दोन्ही हातांना ऊर्ध्व दिशेला ताण द्या. हात खांद्यातून मागे ढकला. दीर्घ श्वास सोडत स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देऊन कमरेतून खाली वाका. सहज शक्य होईल तेवढेच खाली वाका. कमरेला जोर, झटका देऊ नका. गुडघे सरळ ठेवा. खांदे, मान, हात सैल सोडा. दोन्ही हात अधांतरी दोन पायामध्ये ठेवा. हाच श्वास तीन वेळा सोडा. प्रत्येक वेळेस हात पायामधून अधिक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. दीर्घश्वास घेत पूर्व स्थितीला या. हात नमस्कार स्थितीमध्ये ठेवा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन ही क्रिया आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा - वरील सर्व व्यायाम प्रकार करतांना पाय रोवून उभे राहणे. स्वाधिष्ठान चक्राकडे संपूर्ण लक्ष देणे, स्वाधिष्ठान चक्राच्या स्नायूंना ऊर्ध्वताण देणे, शरीराचे सर्व वजन दोन्ही पावलांवर समप्रमाणात असणे, इतर स्नायूंवर अनावश्यक ताण पडलेला असल्यास तो काढून टाकणे इत्यादी क्रिया लक्षपूर्वक करा. व्यायाम प्रकार दोन अ) पाय रोवून उभे रहा. हात कमरेवर ठेवा. श्वास सोडत डाव्या बाजूला शरीराची कमान करा. उजव्या बाजूचा ताण स्वीकारा. थोडं थांबा. ताण मोकळा करा. श्वास घेत पूर्व स्थितीला या. हीच क्रिया क्रमाने उजव्या बाजूने करा. सूर्यनमस्कार एक साधना - - १११