पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब) पालथे झोपा. हाताचे पंजे छातीजवळ जमिनीवर ठेवा. कोपर शरीराजवळ ठेवा. गुडघे व पाय जमिनीवर टेकलेले ठेवा. दोन्ही गुडघे व घोटे एकमेकाला लावा. दीर्घ श्वास सोडा, पोट आतमध्ये ओढा. शरीराचा मध्यभाग वर उचला. थोडं थांबा. ताण मोकळा करा. पोट जमिनीवर टेकवा. क) पालथे झोपा. दोन्ही हात शरीराजवळ ठेवा. पंजे जमिनीवर ठेवा. श्वास सोडून मान, छाती वर उचला. हाताच्या पंजांची मदत घ्या. हीच क्रिया पाठीवर झोपून करा. वर येतांना हात समोर ठेवा. लक्षात ठेवा - स्वाधिष्ठान चक्राचा वापर, प्रणामासन सोडल्यास (शरीर स्थिती ०१, ११, १२) प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्व आसनांमध्ये केला जातो. विशुद्ध चक्राचा वापर, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सर्व आसनांमध्ये केला जातो. कपाळ गुढघ्याला लागणे म्हणजे सूर्यनमस्कार घालता येणे ही संकल्पना डोक्यातून काढून टाका. या आसनामध्ये स्वाधिष्ठान चक्र वर उचलणे हे महत्वाचे आहे. सरळ उभे राहणे महत्वाचे. शरीराचे सर्व वजन दोन्ही पावलांवर समप्रमाणात आहे याकडे लक्ष द्या. (गुडघा, पायाचा चवडा, टाच यावर ताण पडलेला नाही याकडे लक्ष द्या.) स्वाधिष्ठान चक्राच्या स्नायूंना ऊर्ध्वताण घेतल्यानंतर इतर सर्व स्नायू ताण रहित आहेत याची खात्री प्रत्येक वेळी करा. सूर्यनमस्कारातील हस्तपादासन, पादहस्तासन, साष्टांगनमस्कारासन, भुजंगासन, पर्वतासन या आसनांची पूर्वतयारी आपण करत आहोत हे लक्षात घ्या. अनाहतचक्र व विशुद्धचक्र (तोल सांभाळणे) याकडे लक्ष देऊन करावयाचे व्यायाम प्रकार व्यायाम प्रकार एक मानेचे व्यायाम भाग २ मान डावीकडून उजवीकडे गोल फिरविणे सरळ उभे रहा. मान पाठीमागे ढकला. ताण स्वीकारा. क्रिया करतांना पार्श्वभाग मोकळा ठेवा. खांदे सूर्यनमस्कार एक साधना - ११२