पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरविण्याचा प्रयत्न करतो आहोत. शरीरातील सर्वात बलवान स्नायू जीभ आहे असे म्हटले जाते. जीभेचे स्नायू शरीरात कोणकोणत्या अवयवापर्यंत पोहोचलेले आहेत हे आज केलेल्या दीर्घ श्वसन प्रकारातून लक्षात येते. जीभेच्या माध्यमातून पोट व डोळे (मणिपूरचक्र व आज्ञाचक्र) यांचे स्नायू कार्यरत करायचे आहेत. जबडा जास्त मोठा उघडू नका. (जबडा आडकल्यास दोन्ही हातांचे तळवे गालावर दाबून गोलाकार उलट-सुलट फिरवा.) प्रत्येक वेळी आवंढा गिळणे व हात गळ्यावर वरून खाली एकदा फिरविणे विसरू नका. सद्गुरुवंदन - - सराव सत्र दिवस पहिला, सूर्यनमस्कार पूरक प्राणायाम यामध्ये दिल्याप्रमाणे. लक्षात ठेवा - आईचा चेहरा मन:पटलावर पकडून ठेवा. सूर्यनमस्काराची साधना जशी वाढेल तसे या मातृ प्रतिकाचे रुपांतर आदिशक्ती, कुलदेवता, आराध्य देवता, इष्ट देवता किंवा सद्गुरुचरण यामध्ये होत जाईल. ॥जय जय रघुवीर समर्थ ॥ ।। श्रीरामसमर्थ ।। सरावसत्र दिवस दुसरा सूर्यनमस्कार पूरक योगासने / व्यायाम काल अभ्यास केलेले सूर्यनमस्कार पूरक योगासने / व्यायाम सर्व प्रकार क्रमाने करावयाचे आहेत. त्यांची फक्त उजळणी करायची आहे. प्रत्येक कृती एकदा करायची आहे. मी सूचना देणार नाही. प्रत्येक कृती शांतपणे, समजून- उमजून करा. काही अडचण असल्यास विचारा. कृतीचा क्रम खालीलप्रमाणे आहे- सूर्यनमस्कार एक सा १०८