पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळालेला धक्का पोटाच्या वरील भागापर्यंत पोहोचला किंवा नाही याकडे लक्ष द्या. ही क्रिया पुन्हा करा. वेग वाढवा. वर्तुळाकार गतीचा डौल व श्वसनाचा ताल धरा. ही क्रिया १२ + ०१ वेळा करा. नंतर थोडं थांबून शक्य असल्यास पुन्हा दोन वेळा आवृत्ती करा. प्रत्येक आवृत्तीनंतर तीन वेळा ॐकाराचा उच्चार करा. लक्षात ठेवा वरील दोन्ही श्वसनाचा चांगला सराव करा. त्यानंतर या तिसऱ्या प्रकाराचा अभ्यास सुरू करा. या श्वसनक्रियेत पोटाला मिळालेल्या वर्तुळाकार गतीचा डौल व दीर्घ श्वसनाचा ताल यांचा सूर धरून पोटाच्या स्नायूंना अभ्यंग (मसाज) करायचे आहे. - या श्वसन प्रकारामध्ये अनाहत चक्राच्या स्नायूंपासून ओटीपोटाच्या शेवटच्या भागापर्यंतचे स्नायू (मूलाधार चक्र) यांना प्राणतत्त्वाचा अधिक पुरवठा होतो. त्यांची लवचिकता वाढते. कार्यक्षमता वाढते. सिंहमुद्रा - गुडघ्यावर उभे राहा. चवड्यावर पार्श्वभाग टेकवा. (वज्रासन) दोन्ही गुडघ्यामध्ये अंतर ठेवा. दोन्ही हातांचे पंजे दोन गुडघ्यांमध्ये ठेवा. हाताची बोटे आतल्या बाजूने ठेवा. पंजाने जमिनीवर दाब द्या. श्वास घेत मान मागे ढकलण्याचा प्रयत्न करा. आवाज करत घशातून श्वास सोडा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. जीभ बाहेर ओढून धरा. डोळ्यांचे बुबुळ कपाळाकडे सरकवा. दमदारपणे संपूर्ण श्वास घशातून बाहेर सोडा. शरीरावरील स्नायूंचा ताण मोकळा करा. आवंढा गिळा. उजवा हात गळ्यावर ठेवून वरून खाली असा एकदा फिरवा. तीन सर्वसाधारण श्वास घेऊन ही क्रिया क्रमाने आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा प्रत्येक श्वसन प्रकारात अधिकाधिक स्नायू कार्यरत करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. प्रत्येक श्वसन प्रकारात अधिकाधिक प्राणतत्त्व स्नायूंना सूर्यनमस्कार एक साधना - १०७