पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट मोकळे ठेवा. थोडं थांबा, श्वास सोडत स्नायूंचा ताण मोकळा करा. ही क्रिया क्रमाने आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा - श्वास पूर्णपणे घेऊन हनुवटी छातीला लावायची आहे. अन्ननलिकेचा मार्ग श्वासासाठी बंद करणे हा या कृतीचा उद्देश आहे. आता सर्व लक्ष स्वाधिष्ठान चक्रकाकडे नेऊन तेथील स्नायू मोकळे करायचे आहेत. याच वेळेला हाताचा भार गुडघ्यावर देऊन मेरूदंड वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वाधिष्ठान चक्राभोवतीच्या नसा मोकळ्या होत आहेत त्यांचा गुंता सुटतो आहे याचा अनुभव घ्यायचा आहे. भस्त्रिका प्रकार दोन - पूर्वतयारी या प्रकारात मोकळ्या झालेल्या नसा वेगळ्या होत्या याचा अनुभव घ्या. ब) कृतीसाठी तयार सरळ बसा. आरामात बसा. हाताचे पंजे गुडघ्यावर ठेवा. गुडघे हाताने खाली दाबून खांदे वर उचला. दीर्घ श्वास घ्या. छातीमध्ये पकडा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. दोन्ही नाकपुड्या साफ करण्यासाठी श्वास जोराने बाहेर फेका. संपूर्ण लक्ष छातीकडे ठेवा. ही क्रिया याच क्रमाने ३/५/७/ ९/११/१२ + ०१ वेळा आपल्या क्षमतेप्रमाणे करा. नंतर थोडं थांबून शक्य असल्यास पुन्हा दोन वेळा आवृत्ती करा. प्रत्येक आवृत्तीनंतर तीन वेळा ॐकाराचा उच्चार करा. लक्षात ठेवा श्वास जोरात बाहेर फेकतांना संपूर्ण लक्ष नाक व छातीकडे ठेवायचे आहे. यामध्ये चूक झाल्यास घसा खरवडला जाईल. असे झाल्यास हा प्रकार आज पुढे करू नका. - - क) कृतीसाठी तयार सरळ बसा. आरामात बसा. हाताचे पंजे गुडघ्यावर ठेवा. गुडघे हाताने खाली दाबून खांदे वर उचला. दीर्घ श्वास घ्या. छातीमध्ये पकडा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. ओटीपोटाला वरच्या दिशेने धक्का देऊन श्वास जोराने बाहेर फेका. सूर्यनमस्कार एक साधना - १०६