पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ब) कृतीसाठी तयार श्वास घेत दोन्ही हात सरळ रेषेमध्ये, पंजे उघडून, वर उचला. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत ठेवा. श्वास बाहेर फेकत, मुठी आवळून दोन्ही हात खाली ओढा. कृती करतांना सर्व लक्ष विशुद्ध चक्राकडे ठेवा. मान सरळ ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. सुरुवातील ही क्रिया ३/५/७/ ९/११/१२ + ०१ आपल्या क्षमतेप्रमाणे करा. क) कृतीसाठी तयार हीच क्रिया वेगाने दमदारपणे करा. श्वास घेत हात वर फेका, श्वास सोडत हात खाली खेचा. ही क्रिया ३/५/७/९/११/१२ + ०१ आपल्या क्षमतेप्रमाणे करा. नंतर थोडं थांबून पुन्हा (शक्य असल्यास) दोन वेळा आवृत्ती करा. प्रत्येक आवृत्तीनंतर तीन वेळा ॐकाराचा उच्चार करा. आरामदायी दीर्घ श्वसन प्रकार - डोकं भणभणायला लागले आहे. आतमध्ये स्पंदने जाणवत आहेत. आरामदायी दीर्घ श्वसन प्रकार करू आणि पुढील प्रकाराकडे वळू. ( अग्नीसार क्रिया) भस्त्रिका प्रकार दोन - अ) पूर्वतयारी सरळ बसा. आरामात बसा. हाताचे पंजे गुडघ्यावर ठेवा. गुडघे हाताने खाली दाबून खांदे वर उचला. श्वास बाहेर सोडा. हनुवटी छातीला लावा. 3 अन्ननलिकेचा मार्ग श्वासासाठी बंद करणे, हा या कृतीचा उद्देश आहे. आता संपूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. तेथील सर्व स्नायू मोकळे ठेवा. गुडघ्यावर दाब देऊन मेरुदंड वर उचलण्याचा प्रयत्न करा. थोडं थांबा, श्वास घेत स्नायूंचा ताण मोकळा करा. ही क्रिया क्रमाने आणखी दोन वेळा करा. लक्षात ठेवा. श्वास बाहेर सोडून हनुवटी छातीला लावा. ( यानंतर श्वास घेरे-सोडणे याकडे लक्ष देऊ नका.) संपूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्राकडे नेऊन तेथील स्नायू मोकळे करायचे आहेत. याच 3 छाती व कंबर हा आपला हवेचा पंप आहे. श्वास घेतल्यावर श्वासपटल दाबले जाते. त्यामुळे पोटावर दाब येतो. त्यामुळे त्याचा आकार वाढतो. म्हणून याला पोटात श्वास घेणे असे म्हणतात. प्रत्यक्षात आपण फुफ्फुसामध्येच श्वास घेत असतो. सूर्यनमस्कार एक साधना १०४