पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• आरोग्यं भास्करादिच्छेत् । स्मृतिरत्नाकर, मत्स्यपुराण ६७/७१ आपले आरोग्य सूर्यनारायणाच्या कृपाप्रसादावर अवलंबून आहे. भुवनज्ञानं सूर्ये संयमात्। भगवान पतंजली सूर्यनारायणाचे ध्यान केल्याने संपूर्ण चराचर सृष्टीचे ज्ञान होते. • सूर्यआत्माजगतस्तस्थुषश्च -- ऋग्वेद, यजुर्वेद . सूर्यनारायण अखिल विश्वाचे भरण-पोषण-संवर्धन-संचालन करणारा आहे. निधिरेष दरिद्राणां रोगीणां परमौषधम् । सिद्धि:सकलकार्याणां गाथेयं संस्मता रवेः ।। श्रीयाज्ञवल्क्यविरचितं सूर्यस्तोत्र भगवान सूर्यनारायणाची ही आर्यास्तुती दरिद्री लोकांसाठी धनाचा खजिना आहे, रोग्यांसाठी सर्वोत्तम (परम) औषध आहे, सर्वांच्या सर्व मनोकामना सिद्ध करणारी साधना आहे. ● ● • -- -- पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् ।। एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि ||२६|| अस्मिन् क्षणे महाबाहो रावणं त्वं जहिष्यसि - राम-रावण युद्ध सुरू असतांना भगवान अगस्ती ऋषि प्रभुरामचंद्रांना सांगतात, (हे राघवा! संकट काळात दुःख-भय- आपत्तीमध्ये सापडलेला जो कोणी भगवान सूर्यनारायणाचे कीर्तन करतो तो संकटमुक्त होतो.) हे महाबाहो ! युद्धात विजयी होण्यासाठी तू देवाधिदेव, जगदीश्वर सूर्यनारायणाची एकाग्र चित्ताने तीन वेळा पूजा कर. या क्षणी तुला रावणाचा वध करता येईल. सूर्योपासक समर्थरामदास स्वामींचे ब्राह्मतेज व छत्रपती श्रीशिवप्रभूंचे क्षात्रतेज एकत्र आल्याने प्रतापी व भाग्यशाली कालखंड महाराष्ट्रात अवतरला हे वाचक जाणतात. शतक १७ वे. श्रीमंत बाळासाहेब पंत बी. ए. प्रतिनिधी, संस्थान औंध यांनी अठरा वर्षे शास्त्रोक्त सूर्यनमस्कार घातले. स्वत: अनुभूती घेतली. संस्थानातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचा व्यायाम आवश्यक केला. दोन वर्षे विद्यार्थ्यांना आलेले अनुभव लक्षात घेतले. त्यानंतर 'सूर्यास नमस्कार' ही पुस्तिका प्रसिद्ध केली. सन १९२६. सूर्यनमस्कार एक साधना xii