पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 कुंभक प्रकारांचा वापर करतो. विश्राम दीर्घ श्वसन पूरक तेवढी जास्त हवा भरून घ्या. - नाकाने दीर्घ श्वास घ्या. श्वास घेतांना तो सलग घ्या. छातीमध्ये शक्य कुंभक आत घेतलेला श्वास छातीमध्ये पकडून ठेवा. मल-मूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव पूर्णपणे वर उचलून धरा. (मूलबंध लावा). मान सरळ आहे याकडे लक्ष द्या. मान-पाठ-खांदे यांचे स्नायू मोकळे करा. थोडं थांबा. रेचक बंध सोडा म्हणजेच मल-मूत्र विसर्जनाचे दोन्ही अवयव मोकळे सोडा. श्वास झटपट सोडून द्या. लक्षात ठेवा - - दीर्घ श्वसनाचा (प्राणायामाचा) सराव करतांना ऊर्जा तयार होते. शरीराचे उष्णतामान वाढते. श्वसन प्रक्रिया सशक्त होते. रक्ताभिसरणाची गती वाढते. आपल्याला विश्रांतीची गरज भासते. दीर्घ आरामदायी श्वसन केल्याने थकवा लगेच दूर होतो. हृदयाचे ठोके साधारण गतीला स्थिर होतात. खाली 2 श्वास घेतांना तो टप्प्या टप्प्याने थांबत थांबत किंवा धक्का देत घेतला जाणार नाही याकडे लक्ष द्या. श्वास घेतल्यानंतर (किंवा घेतांना) मूलबंध लावल्यामुळे प्राणतत्त्वाचा सरकण्याचा मार्ग बंद होतो. बंध लावून कुंभक करणे म्हणजे फुफ्फुसाला विश्रांती देण्यासारखे आहे. ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. तेवढीच कठीण आहे. सबुरीने समजून उमजून करा. 1 कुंभकाच्या वेळी श्वसन क्रिया थांबलेली असते. श्वसन संस्थेचा हा विश्रांती काळ. या कृतीकडे अधिक लक्ष द्या. सुरुवातीला कुंभकाचा कालावधी अल्प ठेवून दीर्घश्वसनाचा सराव करा. 2 ध्यानामध्ये आपण शरीर अवयवांच्या सर्व स्नायूपेशी मोकळ्या करत जातो. शरीराचे अस्तित्व विसरण्याचा प्रयत्न करतो. ज्या प्रमाणात या स्नायूपेशी मोकळ्या होतात त्या प्रमाणात श्वासातून शरीरात घेतलेले प्राणतत्त्व ऊर्ध्वदिशेला मस्तिष्कापर्यंत जाऊन पोहचते. यातूनच हवा-प्राणतत्त्व- श्वसन-पेशीकार्य यांचा कार्यकारण भाव स्पष्ट होतो. सूर्यनमस्कार एक साधना १०२