पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। सरावसत्र दिवस दुसरा || सूर्यनमस्कार पूरक प्राणायाम || सूर्यनमस्कार पाच तंत्र सूर्यनमस्काराचा सराव करतांना खालील पाचतंत्र लक्षात ठेवा. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी 'दृष्ट्या वचसा मनसा' प्रयत्न करा. स्नायूंची ताकद त्याच्या ताण सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, त्यांच्या आकार किंवा वजनावर नाही. ज्या ज्या ठिकाणी मन एकाग्र होते तेथे ऊर्जा, म्हणजेच शक्ती तयार होते. • स्नायू ज्या प्रमाणात श्रम करतात त्या प्रमाणात त्यांना प्राणतत्त्वाचा खुराक आवश्यक आहे. . ● . ● सूर्यनमस्कारमध्ये ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत होतात. सूर्यनमस्काराची संकल्पना दररोजच्या सरावामध्ये अनुभविण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करावयाचे आहेत. दीर्घ श्वसन काल अभ्यास केलेले दीर्घ श्वसनाचे सर्व प्रकार क्रमाने करावयाचे आहेत. मी सूचना देणार नाही. प्रत्येक कृती शांतपणे, समजून-उमजून करा. काही अडचण असल्यास विचारा. कृतीचा क्रम खालीलप्रमाणे आहे अ) दीर्घ श्वसन, ब) वायू ॐ, क) नाद ॐ सूर्यस्तुती अ) नाडीशोधन प्राणायाम, ब) पूरक - रेचक, क) नाडीशोधन प्राणायाम दोन, अ) अनुलोम-विलोम प्राणायाम, ब) पूरक - रेचक, क) अनुलोम-विलोम प्राणायाम दोन. आपण कुंभकाचा एक प्रकार बघितला. खोल श्वास घेऊन तो छातीमध्ये पकडून ठेवला की तो झाला आंतरकुंभक. श्वास पूर्णपणे बाहेर सोडून तो बाहेरच रोखून धरला की तो बाह्यकुंभक सूर्यनमस्कार करतांना आपण या दोन्ही सूर्यनमस्कार एक साधना १०१