पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यामुळे छोटी-मोठी, दुखणी - खुपणी, आजारपण, शारीरिक कमतरता दूर होतात. या सर्व विकारांना प्रतिबंध घातला जातो. प्राथमिक स्वरुपातील या विकारांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यांचे रुपांतर जीवघेण्या रोग-व्याधिमध्ये होते. हे सर्व टाळण्यासाठी तसेच प्रत्येकाची सूर्यनमस्कार साधना अखंडतपणे सुरू राहावी म्हणून ही अत्यंत महत्वाची आश्वासक स्वयंसूचना आहे. सद्गुरु वंदन जगातील सर्व समर्थ भक्त व सूर्यनमस्कार साधक यांना माझा साष्टांग नमस्कार. ॥जय जय रघुवीर समर्थ ।। ● ।। श्रीरामसमर्थ ।। सूर्यनमस्कार आसन विधी पाच सूत्रे आसनाचा उद्देश आणि शरीरस्तरावर होणारे फायदे याकडे लक्ष द्या. • आसानतील ऊर्जाचक्राकडे संपूर्ण लक्ष द्या. त्याच्या सूचना |स्वीकारतांना शरीराचा गुरुत्वमध्य सांभाळा. • आसनातील श्वसनप्रक्रियेकडे लक्ष द्या. त्याच वेळेला दृष्टी कोठे स्थिर ठेवायची याकडे लक्ष द्या. 0 आपल्या क्षमतेप्रमाणे आसनातील उच्चतम स्थिती घेतल्यावर पार्श्वभाग मोकळा आहे याकडे लक्ष द्या. • उच्चतम स्थितीमध्ये थोडं थांबा. नंतर ताण मोकळा करा. ज्या स्नायुंना ताण-दाब दिलेला आहे तेच स्नायू मोकळे होत आहेत याकडे लक्ष द्या. ||जय जय रघुवीर समर्थ || सूर्यनमस्कार एक साधना १००