पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्जरासनाचा योग्य पद्धतीने चांगला सराव करा. गुरूवंदन (बैठासाष्टांग प्रणाम) योग्य पध्दतीने करा. स्वाधिष्ठान च्रकाचे स्नायू मोकळे होण्यासाठी फार कालावधी घेतात. येथील बहुसंख्य स्नायू आळशी आणि कामचुकार आहेत. ढिम्म बसून भोवतालच्या क्रिया पाहत असतात. त्यांना कार्यरत करण्यासाठी संयम व सततचे प्रयत्न आवश्यक आहेत. आईच्या मायेने त्यांना कार्यरत करण्याचा प्रयत्न करा. संदर्भ पूर्वार्ध सूर्यनमस्कार प्रतिक घ्या समर्पणाचा श्लोक - आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वंति दिने दिने जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते ।। श्लोकाचा अर्थ जो दररोज नित्यनेमाने सूर्यनमस्काराचा सराव करतो त्याला जन्मजन्मांतरी (आरोग्य, धनसंपत्ती, बुद्धी यांचे) दारिद्रय येत नाही. अन्वय - - सूर्यनमस्काराच्या अखंड सरावामुळे शरीर आरोग्य संपन्न, बलवंत होते. मन शांत-स्थिर राहते. बुद्धीची स्मरणशक्ती, मनाची एकाग्रता वाढते. या शारीरिक अवस्थेत आपण अधिक कार्य करतो. कामाचे तास वाढतात. प्रत्येक कृती सहज आणि आत्मविश्वासाने केली जाते. यश हमखास मिळतेच. यशाने यश वाढते. हे यश सुख, शांती, समृध्दी घेऊन येते. फलश्रुती श्लोक अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनं सूर्यपादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहं।। - हे सूर्यतीर्थ व्याधी तसेच अकाली मृत्यू यापासून संरक्षण श्लोकाचा अर्थ देणारे आहे. त्याचे मी प्राशन करतो. अन्वयार्थ सूर्यनमस्काराच्या अखंड सरावामुळे शरीर आरोग्यसंपन्न, बलवंत होते. सूर्यनमस्कार एक साधना ९९