पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जमिनीला टेकविण्याचा प्रयत्न करू नका. आणखी एकदा श्वास सोडा. थोडं पुढे वाकण्याचा प्रयत्न करा. स्वाधिष्ठान चक्राचे सर्वस्नायू आतून वर उचलण्याचा प्रयत्न करा. तिसऱ्यांदा श्वास सोडा. खांदे-म दे - मान - हात यांचे स्नायू मोकळे करा. हनुवटी छातीला लावा. दृष्टी छातीकडे ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. स्वाधिष्ठान चक्राचा ऊर्ध्व ताण स्वीकारा थांबा. याच स्थितीमध्ये तीन सर्वसाधारण श्वास घ्या. स्वाधिष्ठान चक्राच्या स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. दीर्घ श्वास घ्या. तो छातीमध्ये पकडा. सावकाश सरळ उभे राहा. हस्तपादासनातील कौशल्य प्रथम कौशल्य - हस्तपादासनातील कौशल्याप्रमाणे त्यांची इतर नावे आहे-द्विपादआकर्षणासन, जानुभालासन, जानुशिरासन, हस्तपादासन हे उभे राहून केलेले पश्चिमोत्तानासन आहे. दोन पायामध्ये अंतर ठेवा. शक्य होईल तेवढेच खाली वाका. हात ढिले सोडा. कंबर वर उचला. पोट आत घ्या. हनुवटी छातीला टेकवा. (हात जमिनीला टेकले नाहीत तरी चालेल. गुडघ्यामध्ये वाकलात तरी चालेल.) या आसनामध्ये मेंदू व पायांना अधिक रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयावर ताण पडत नाही. हा एक महत्त्वाचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. द्वितीय कौशल्य जसा सराव वाढेल त्याप्रमाणे हळूहळू दोन पायामध्ये अंतर कमी करण्याचा प्रयत्न करा. गुडघे न वाकवता हाताचे तळवे जमिनीवर संपूर्ण टेकविण्यासाठी प्रयत्न करा. हातांची जागा हळूहळू पायांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या क्षमतेप्रमाणे या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. हाताचा फक्त आधार घ्या. ( शरीराचे वजन कमरेवर घेऊ नका. हाताने जमिनीला रेटा देऊ नका.) खांदे-मान ढिली ठेवा. श्वास सोडा आणि पोट आत घेत स्वाधिष्ठान चक्र वर उचला. कंबरेचा ऊर्ध्वताण तसाच ठेऊन सर्व स्नायू मोकळे करा. या स्थितीमध्ये थांबा. गुडघ्यात वाकून खाली बसा. अर्धभुजंगासनातील कौशल्य या आसनाला पूरक आहे. सूर्यनमस्कार एक साधना ९७