पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भस्त्रिका प्रकार एक याचा विशेष उपयोग या आसनामध्ये होतो. फारच त्रास होत असल्यास एक / दोन दिवस हे आसन करू नका. मानेच्या मणक्यांमध्ये दोष असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन हे आसन करा. सूर्यमंत्र- ॐ सूर्यायनमः आसनाचा उद्देश - - - खाली वाकून स्वाधिष्ठान चक्राचे सर्व स्नायू ऊर्ध्व दिशेला ताणणे. शरीरातील इतर स्नायूंवर असणारा ताण मोकळा करणे. ऊर्ध्वताण घेऊन थोडा वेळ स्थिर राहणे. स्वाधिष्ठान चक्राकडे मन एकाग्र करणे. आरोग्य लाभ - घसा, या आसनामुळे मुत्राशयाचे विकार मूतखडा, बहुमूत्र - बंधमूत्र दूर राहतात. झोप न लागणे, अशक्तपणा किंवा थकवा जाणवत नाही. पाठ, खांदे, छाती, पोट यांच्या स्नायूंची लवचिकता वाढते. शरीरातील कफ प्रकार संतुलित राहतो, भूक वाढते. पोटातील वायू व इतर विजातीय द्राव पुढे आतड्यात ढकलले जातात. एकूणच गाढनिद्रा व संपूर्ण विश्रांती यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हस्तपादासनातील कृती उभे राहण्याची स्थिती सरळरेषेत आहे याची चार वेळा खात्री करा. सुरुवातीला दोन पायामध्ये ९-१० इंचाचे अंतर ठेवा. दोन्ही पावलांवर शरीराचे संपूर्ण वजन समप्रमाणात आहे याची खात्री करा. हातांना अगोदरच्या आसनातील उर्ध्वताण पुन्हा द्या. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष द्या. श्वास सोडा. खाली वाका. पोट आत घ्या. हनुवटी छातीला टेकवा. जेवढे वाकता येणे सहज शक्य आहे तेवढेच खाली वाका. गुडघे सरळ ठेवा. हात सूर्यनमस्कार एक साधना हस्तपादासन ९६