पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रथम आणि द्वितीय कौशल्यांचा सराव करतांना कोणतेही स्नायूंचे दुखणे सुरू होत नाही याची खात्री झाल्यावर पुढील कौशल्याचा सराव करा. खांद्यातून हात मागे घेतांना मान मागे ढकला. 12 ती खांद्यात पकडा. पार्श्वभाग मोकळा. पूर्ण शरीराला ऊर्ध्वताण. काही साधक या सूर्यनमस्कार शरीर स्थितीमध्ये ताडासन करतात. चवड्यावर उभे राहून उंच होणे आणि त्याच वेळी पार्श्वभाग मोकळा ठेवणे हे जमणे अवघड आहे. या प्रकारात स्नायूंना झटका मिळतो. सूर्यनमस्कार आसनातील प्राथमिक कौशल्य मिळविण्यासाठी स्थिरसुखमासनम् । या व्याख्येमध्ये हे बसत नाही. शरीराला मिळालेला ऊर्ध्व ताण सुरुवातीला हात, खांदे, छाती येथील भागावर जाणवेल. जसा सराव वाढेल तसा हा ताण पायाच्या घोट्यापासून हातांच्या बोटापर्यंत जाणवेल. स्नायू क्षोभ गुडघे, कंबर, खांदे यावर अनावश्यक ताण दिला गेल्यास या स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. पार्श्वभागाचे स्नायूंवर ताण आल्यास पाठ दुखणे दिवसभर सुरु राहते. कमरेतून शरीराची कमान करण्याचा प्रयत्न केल्यास कंबर व गुडघे त्रास देतात. जमीन पायाने रेटण्याचा प्रयत्न केल्यास गुडघ्याचे स्नायूंना चुकीचा ताण मिळतो. खांद्याचे स्नायू आवळून धरले आणि मान मागे ढकलली तर मानेला त्रास होणारच. सावधान - - सरळ उभे राहण्यासाठी दोन्ही पावलांवर शरीराचे वजन समप्रमाणात ठेवा. शरीर कमानीचा मध्य खांदा ठेवा. चवड्यावर उभे राहणे, झटका देणे हे प्रकार अपेक्षित नाहीत हे लक्षात ठेवा. सरळ उभे राहून संपूर्ण लक्ष मानेकडे ठेऊन जास्त ताण न देता हे आसन करण्याचा प्रयत्न करा. 12 हातात काठी घेऊन उंच दांडीवर कपडे वाळत घालण्याची क्रिया करतांना मानेची ही स्थिती असते. सूर्यनमस्कार एक साधना ९५