पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. श्वास घ्या. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. हात खांद्यातून मागे ढकला. श्वास घ्या. डोके मागे ढकला. आणकी एकदा श्वास घ्या. डोके मागे ढकला. मान खांद्यामध्ये पकडा. पाश्र्वभाग मोकळा ठेवा. पोट मोकळे ठेवा. ताण स्वीकारा थांबा. स्नायूंना दिलेला ताण मोकळा करा. मान सरळ करा. हात सरळ करा. शरीराच्या कोणत्या भागातून ताण मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. ऊर्ध्वहस्तासन कौशल्य प्रथम कौशल्य या आसनाचे प्रथम कौशल्य प्रणाम- मुद्रा आहे. शरीरातील कोणत्याही भागाला जादा ताण-दाब न देता शांतपणे या आसनात स्थिर राहणे मुद्रेमध्ये अपेक्षित आहे. सरळ उभे रहाणे. श्वास घेऊन हात खांद्यातून डोक्यावर ताणणे. पायांनी जमीन घट्ट पकडणे. हळूच शरीरावरचा ताण काढून घेणे. खांदा- मान वर उचललेल्या स्थितीमध्ये ठेवणे. 10 पार्श्वभाग मोकळा ठेवणे. या आसनात वृक्षासनाचा अंर्तभाव आहे. पाय जमिनीवर रोवणे, शरीर वर उचलणे हे वृक्षासनात करायचे आहे. द्वितीय कौशल्य - - सरळ उभे रहाणे अत्यंत महत्वाचे. श्वास घ्या. खांद्यातून हात मागे घ्या. पुन्हा पार्श्वभाग मोकळा आहे याकडे लक्ष द्या. 11 श्वास घेतल्याने छातीला आलेला उभार ताणला गेला आहे याकडे लक्ष द्या. तृतीय कौशल्य हे आसन करतांना शरीराचे वजन (गुरुत्वमध्य) विशुद्ध चक्रापासून जमिनीवर दोन पावलांमध्ये लंबरेषेत ठेवा. 10 पार्श्वभाग मोकळा नसल्यास सर्व मेरुदंड (सर्व शरीर) वर उचलला जातो. शरीराला ऊर्ध्वताण देण्याचा उद्देश सफल होत नाही. 11 सरळ उभे नसाल तर कमरेतून शरीराची कमान होईल. शरीराला ऊर्ध्वताण मिळणार नाही. छातीला ताण देता येणार नाही. सूर्यनमस्कार एक साधना ९४