पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आरोग्य लाभ संपूर्ण शरीराला ऊर्ध्व ताण वारंवार मिळाल्यामुळे शरीरावर किंवा आत असलेली सूज, स्नायूंमधील गाठ, जखमेतील पू. डोळ्यामधील विजातिय द्राव, चेहऱ्यावरील मुरुम सुरकुत्या तसेच इतर स्नायूंचे विकार दूर होतात. मान, खांदे, दंड, कोपर, मनगट यांचे स्नायू मोकळे होतात. त्यांची लवचिकता वाढते. पायाच्या घोट्यापासून हातांच्या बोटापर्यंत अनेक वेळा ताण मिळाल्यामुळे श्वसन क्रिया सुधारते. श्वसनेंद्रिये सशक्त होतात. अधिक प्रमाणात प्राणतत्त्व मिळाल्यामुळे आरोग्य सुधारते. वारंवार ताण मिळाल्यामुळे शरीराची उंची वाढते. ऊर्ध्वहस्तासन कृती मागील आसन पूर्ण झाल्यानंतर शरीर ताण रहित स्थितीमध्ये आहे. म्हणजे प्रणामासनातील मुद्रा स्थितीमध्ये आहे. - - - ऊर्ध्वहस्तासन, सरळ ताठ उभे रहा. पायाने जमीन पक्की पकड़ा. दोन्ही पावलांवर शरीराचे संपूर्ण वजन समप्रमाणात आहे याची खात्री करा. श्वास घ्या. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. नमस्कार स्थितीमध्ये असलेले हात डोक्यावर उंच उचला. आणखी एकदा श्वास घ्या. हातांना ऊर्ध्व दिशेला ताण द्या. तिसऱ्यांदा श्वास घ्या. ताणा. संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट मोकळे ठेवा. ताण स्वीकारा. थांबा. स्नायूंचा दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या भागातून मोकळा होतो आहे याकडे लक्ष द्या. पुन्हा संपूर्ण शरीराला आतून ऊर्ध्वदिशेला ताण द्या. श्वास घ्या. विशुद्ध चक्राकडे लक्ष द्या. हात खांद्यातून मागे ढकला. छातीला मिळालेला ऊर्ध्वताण स्वीकारा. आणखी एकदा श्वास घ्या. हात खांद्यातून मागे ढकला. तिसऱ्यांदा श्वास घ्या. हात खांद्यातून मागे ढकला. दृष्टी हाताच्या तळव्यावर ठेवा. पार्श्वभाग मोकळा ठेवा. पोट मोकळे ठेवा. ताण स्वीकारा थांबा. दोन्ही हात सरळ करा. सर्व स्नायूंचा दिलेला ताण मोकळा करा. दिलेला ताण शरीराच्या कोणत्या सूर्यनमस्कार एक साधना ९३